Lokmat Money >शेअर बाजार > हिंडेनबर्गचे आरोप 'निराधार', अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ

हिंडेनबर्गचे आरोप 'निराधार', अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ

Gautam Adani: अमेरिकन संस्थेने अदानी समूहाची चौकशी केली, ज्याl हिंडनबर्गचे आरोप निराधार असल्याचे आढळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 03:05 PM2023-12-05T15:05:59+5:302023-12-05T15:06:18+5:30

Gautam Adani: अमेरिकन संस्थेने अदानी समूहाची चौकशी केली, ज्याl हिंडनबर्गचे आरोप निराधार असल्याचे आढळले.

Gautam Adani Stocks Rise Up To 18% After Us Agency Finds Hindenburg's Allegations Irrelevant | हिंडेनबर्गचे आरोप 'निराधार', अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ

हिंडेनबर्गचे आरोप 'निराधार', अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ

Gautam Adani Group: भारतातील दिग्गज उद्योगपती आणि जगातील 20 वे श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप 14 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. अलीकडेच गौतम अदानी यांनी कर्ज घेण्यासाठी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC) शी संपर्क साधला होता. श्रीलंकेत बंदर बांधण्यासाठी गौतम अदानी समूह IDFC कडून $553 मिलियन कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

अदानी समूह श्रीलंकेत कंटेनर टर्मिनल बांधण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून $553 मिलियन कर्ज घेणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अहवालाची पडताळणी होऊ शकली नसली तरी एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. कर्ज देण्यापूर्वी या अमेरिकन संस्थेने गौतम अदानी समूहाची चौकशी केली, ज्यामध्ये हिंडन बर्ग रिसर्चच्या अहवालात केलेले आरोप निराधार असल्याचे आढळले. हे वृत्त समोर येताच मंगळवारी सकाळी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.

हिंडनबर्ग रिसर्चचे आरोप गौतम अदानी यांच्या कॉर्पोरेट फसवणुकीचा खुलासा करत नसल्याचे तपासात अमेरिकन सरकारला आढळून आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मंगळवारी गौतम अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 10 टक्क्यांनी वाढले, तर अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर 18 टक्क्यांहून अधिक वाढले. तसेच, अदानी टोटल गॅस 12 टक्क्यांनी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स 9 टक्क्यांनी वाढले. याशिवाय, एनडीटीव्ही, अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर आणि अदानी विल्मर, एसीसी सिमेंटच्या शेअर्समध्येही 6 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यामुळे समूहाचे मार्केट कॅप 14 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

Web Title: Gautam Adani Stocks Rise Up To 18% After Us Agency Finds Hindenburg's Allegations Irrelevant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.