Join us

Adani Group बाबत बँका चिंतेत? सर्वाधिक कर्ज देणाऱ्या एसबीआयने दिली 'ही' माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 3:15 PM

अदानी समुहा संदर्भात हिंडेनबर्ग प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 60,000 च्या खाली तर निफ्टी 17500 च्या जवळ आहे.

अदानी समुहा संदर्भात हिंडेनबर्ग प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स 60,000 च्या खाली तर निफ्टी 17500 च्या जवळ आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. यात अदानी समुहाचा मोठा तोटा झाला आहे, आता अदानी समुहाला कर्ज देणाऱ्या बँकांचे काय होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

आता या संदर्भात बँकाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. देशाची सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने या प्रकरणात समोर आल्यावर सांगितले की भव‍िष्‍यात फिंगिंग रिक्वेस्टवर संपूर्ण विचार करण्‍याचा निर्णय घेतला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया से अडानी समुहाला सर्वात जास्त कर्ज दिले आहे.

'हिंडनबर्गच्या अहवालानंतर बँका सावध झाल्या आहेत. मात्र अदानी समूहाला यापूर्वी दिलेल्या कर्जाबाबत चिंता करण्यासारखे काहीच नाही. एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले की, आरबीआयच्या निश्चित मानकांच्या आधारेच अदानी समूहाला कर्ज देण्यात आले आहे. कर्ज देताना नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले आहे, असंही बँकेने म्हटले आहे. 

हे आहेत हिंडेनबर्गचे पाच आरोप, ज्यामुळे अदानींच्या शेअर्सना लागला सुरुंग, बाजारात हाहाकार

'अदानी समूहाने अलिकडच्या काळात एसबीआयकडून कोणताही निधी घेतला नाही. अदानी समूहाने एसबीआयकडून कोणत्याही प्रकारच्या निधीसाठी विनंती केल्यास त्याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असं बँकांकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :गौतम अदानीएसबीआयबँक