Ge Power India Ltd Share: जीई पॉवर इंडियाचे शेअर्स आज गुरुवारी फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर कामकाजादरम्यान 11.7% वाढून 371 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे मोठी ऑर्डर आहे. कंपनीला जय प्रकाश पॉवर व्हेंचर्सकडून 774.9 कोटी रुपयांच्या दोन ऑर्डर मिळाल्या आहेत. जीई पॉवर इंडियाच्या शेअर्समध्ये आज सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात वाढ झाली. या कालावधीत हा शेअर सुमारे 45% वाढला आहे. जीई पॉवर इंडिया ही देशातील प्रमुख इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन इक्विपमेंट्स मार्केटमधील प्रमुख कंपनी आहे. त्यांचे मार्केट कॅप 2,366.41 कोटी रुपये झालंय.
कंपनीनं काय म्हटलं?
कंपनीच्या एक्सचेंज फाीलिंगनुसार, निग्री येथील 490.5 कोटी रुपये किमतीच्या डी अँड ई आणि निग्री सुपर थर्मल पॉवर प्लांटसाठी एफजीडी आणि 284.4 कोटी रुपये किमतीच्या बिना येथील बिना थर्मल पॉवर प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, मार्चमध्ये कंपनीने एनटीपीसीकडून एनटीपीसी तांडाला जनरेटर स्पेअर्स आणि एनटीपीसी नबीनगरला टर्बाइन ब्लेड्स पुरवण्यासाठी 24 कोटी रुपयांची ऑर्डर जिंकली होती. बॉयलर फायरिंग सिस्टमच्या पुरवठ्यासाठी हिंदुस्तान झिंकनं जीई पॉवरला 8.75 कोटी रुपये किमतीची आणखी एक ऑर्डर दिली.
शेअर्समध्ये तेजी
मार्च 2023 पासून कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या कालावधीत शेअरच्या किंमतीत 254% वाढ झाली आहे. हा स्टॉक एका वर्षात 230% वाढलाय. जानेवारी 2018 मध्ये या शेअरची किंमत 1048 रुपये होती. या किंमतीपासून हे शेअर्स सध्या 66.50% घसरले आहेत. बीएसई आणि एनएसई या दोघांनी दीर्घ मुदतीसाठी एएसएम (अतिरिक्त पाळत ठेवणे उपाय) फ्रेमवर्क अंतर्गत जीई पॉवर स्टॉक ठेवला आहे. शेअर्सच्या किमतीतील मोठ्या प्रमाणातील अस्थिरतेबद्दल गुंतवणूकदारांना सावध करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजनं एएसएम फ्रेमवर्कमध्ये स्टॉक ठेवले आहेत.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)