Join us  

GEM Enviro Multibagger Share : १५ दिवसांतच केलं मालामाल, ७५ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला २८० रुपयांपार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 2:46 PM

GEM Enviro Multibagger Share : जवळपास १५ दिवसांपूर्वी आलेल्या आयपीओनं आपल्या गुंतवणूकदार श्रीमंत केलं आहे. वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा हा आयपीओ असून गुरुवारी हा शेअर १० टक्क्यांनी वधारून २८०.५० रुपयांवर पोहोचला.

GEM Enviro Multibagger Share : जवळपास १५ दिवसांपूर्वी आलेल्या आयपीओनं आपल्या गुंतवणूकदार श्रीमंत केलं आहे. वेस्ट मॅनेजमेंट कंपनी जीईएम एन्व्हायरोचा हा आयपीओ आहे. गुरुवार, ११ जुलै २०२४ रोजी जीईएम एन्व्हायरोचा शेअर १० टक्क्यांनी वधारून २८०.५० रुपयांवर पोहोचला. कंपनीचा आयपीओ १९ जून रोजी खुला झाला आणि तो २१ जूनपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये जीईएम एन्व्हायरोच्या शेअरची किंमत ७५ रुपये होती. जीईएम एन्व्हायरोचे शेअर्स ७५ रुपयांच्या इश्यू प्राइसवरून २५० टक्क्यांनी वधारले आहेत.

५ दिवसांत ३३ टक्क्यांची वाढ

५ जुलै २०२४ रोजी जीईएम एन्व्हायरोचा शेअर २१०.३५ रुपयांवर होता. ११ जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर २८०.५० रुपयांवर पोहोचला. जेईएम एन्व्हायरोचे शेअर्स २६ जून रोजी बाजारात लिस्ट झाले होते. कंपनीचा शेअर जवळपास १०० टक्क्यांच्या वाढीसह १४९.६२ रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७५ रुपये होती. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले आहेत. जीईएम एन्व्हायरोमध्ये प्रवर्तकांचा ७३.४४ टक्के हिस्सा आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग २६.५६% आहे. कंपनीचं मार्केट कॅप सुमारे ६३२ कोटी रुपये आहे.

आयपीओला तुफान प्रतिसाद

जीईएम एन्व्हायरोचा आयपीओ एकूण २६५.१३ पट सब्सक्राइब झाला होता. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २४०.२५ पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या (एनआयआय) श्रेणीत ४६२.८९ पट तर, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा १६०.२२ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार केवळ १ लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १६०० शेअर्स ठेवण्यात आले होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १२०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार