Lokmat Money >शेअर बाजार > 36 लाख स्मार्ट मीटर लवण्यासाठी मिळाली 3121 कोटींची ऑर्डर; रॉकेट बनला या छोट्या कंपनीचा शेअर

36 लाख स्मार्ट मीटर लवण्यासाठी मिळाली 3121 कोटींची ऑर्डर; रॉकेट बनला या छोट्या कंपनीचा शेअर

जीनस पॉवरच्या शेअरमध्ये ही तेजी तिच्या उपकंपनीला मिळालेल्या 3000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या ऑर्डर मुळे आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 04:21 PM2023-10-23T16:21:01+5:302023-10-23T16:21:17+5:30

जीनस पॉवरच्या शेअरमध्ये ही तेजी तिच्या उपकंपनीला मिळालेल्या 3000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या ऑर्डर मुळे आली आहे.

genus power infrastructures subsidiary has received 3121 crore order for 36 lakh smart meters The share became a rocket | 36 लाख स्मार्ट मीटर लवण्यासाठी मिळाली 3121 कोटींची ऑर्डर; रॉकेट बनला या छोट्या कंपनीचा शेअर

36 लाख स्मार्ट मीटर लवण्यासाठी मिळाली 3121 कोटींची ऑर्डर; रॉकेट बनला या छोट्या कंपनीचा शेअर

शेअर बाजारातील स्मॉलकॅप कंपनी असलेल्या जीनस पॉवर इंफ्रास्ट्रक्चर्सच्या (Genus Power Infrastructures) शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. या छोट्या कंपनीचा शेअर सोमवारी 5 टक्क्यांच्या तेजीसह 267.80 रुपयांवर पोहोचला आहे. जीनस पॉवरच्या (Genus Power)  शेअचा 52 आठवड्यांतील उच्चांक 290 रुपये एवढा असून तो शुक्रवारी 255.05 रुपयांवर बंद झाला होता. जीनस पॉवरच्या शेअरमध्ये ही तेजी तिच्या उपकंपनीला मिळालेल्या 3000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या ऑर्डर मुळे आली आहे.

3121 कोटी रुपयांची ऑर्डर -
जीनस पॉवर इंफ्रास्ट्रक्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, तिचा संपूर्ण मालकी हक्क असलेल्या कंपनीला 3121.42 कोटी रुपयांचा लेटर ऑफ अवॉर्ड (LOA) मिळाला आहे. हा ऑर्डर अॅडव्हान्स्ड मीटरिंग इंफ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या अपॉइन्टमेंटसाठी आहे. या ऑर्डरमध्ये 36.27 लाख स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा पुरवठा, इंस्टॉलेशन आणि कमीशनिंगसह अॅडव्हान्स मीटरिंग इंफ्रास्ट्रक्चर सिस्टिमचे डिझाइन करणे सामील आहे. या ऑर्डरसोबतच कंपनीची टोटल ऑर्डर बुक आता 17000 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले आहे.

6 महिन्यांत 198% ची तेजी -
जीनस पॉवर इंफ्रास्ट्रक्चर्सच्या शेअरमध्ये गेल्या 6 महिन्यांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 24 एप्रिल 2023 रोजी 88.97 रुपयांवर होता. तो 23 ऑक्टोबर 2023 रोजी 267.80 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 6 महिन्यांत 198 टक्क्यांची तेजी आली आहे. या वर्षात आतापर्यंत जीनस पॉवरच्या शेअरमध्ये 213 टक्क्यांची तेजी आली आहे. कंपनीचा शेअर या वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारी 2023 रोजी 84.65 रुपयांवर होता, जो आता 267.80 रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: genus power infrastructures subsidiary has received 3121 crore order for 36 lakh smart meters The share became a rocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.