सध्या शेअर बाजार विक्रमी पातळीवर आहे. बाजारातील या मजबूत तेजीत मिडकॅप क्षेत्रात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. या क्षेत्रातील काही शेअर्सवर एक्सपर्ट्स बुलिश आहेत. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे सिद्धार्थ सेदानी यांनी शॉर्ट पोझिशनल आणि लॉन्ग टर्मसाठी खरेदी करण्यासाठी 3 सर्वोत्तम स्टॉकची निवड केली आहे. या शेअर्समध्ये एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, करुर वैश्य बँक आणि कल्पतरू प्रोजेक्ट्सच्या शेअर्सचा समावेश आहे.
लाँग टर्मसाठी शेअर
मार्केट तज्ज्ञांनी लाँग टर्मसाठी कल्पतरू प्रोजेक्ट्सचा स्टॉक निवडला आहे. स्टॉकसाठी 624 रुपयांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. हा शेअर सध्या 553 रुपयांवर व्यवहार करत आहे. हे एक ग्लोबल ईपीसी प्लेयर आहेत. त्यांच्याकडे पॉवर ट्रान्समिशन, डिस्ट्रिब्युशन आणि रेल्वेची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. कंपनीकडे सुमारे 45,000 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे.
एक्सपर्ट्सचा आवडता शेअर
सिद्धार्थ यांनी करुर वैश्य बँकेच्या स्टॉकवर पोझिशनल पिकसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. कंपनीचा शेअर 132 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. यासाठी 146 रुपयांचं टार्गेट दिलं आहे. कंपनीनं गेल्या तिमाहीत उत्तम कामगिरी केली आहे, जी यापुढेही सुरू राहण्याची अपेक्षा आहे. याचं कारण मॅनेजमेंटनं चांगला गाईडंस दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
शॉर्ट टर्ममध्ये कमाई
तज्ज्ञांनी ऑटो अॅन्सिलरीज स्टॉक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीजवर शॉर्ट टर्मसाठी खरेदीची शिफारस केली आहे. हा शेअर 1658 रुपयांवर व्यवहार करत आहे. यासाठी 1750 रुपयांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. ही कंपनी अलॉय व्हील सस्पेन्शनसारखी उत्पादनं तयार करतं. यांचं मार्जिनही उत्तम दिसत आहे. कंपनीची ऑर्डर बुक सुमारे 950 कोटी रुपये आहे.
(टीप - यामध्ये देण्यात आलेली माहिती ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)