शेअर बाजारातील एका मल्टिबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यां लोकांचे पैसे केवळ 15 दिवसांतच डबल झाले आहेत. हा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. महत्वाचे माणजे, या स्टॉकमध्ये गेल्या 5 दिवसांपासून सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. गेल्या 5 दिवसात या स्टॉकने 20 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. हा शेअर आजही साधारणपणे 5 टक्क्यांच्या उसळीसह अप्पर सर्किटवर बंद झाला.
धडाधड लागतेय अप्पर सर्किट -
आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देणारा हा शेअर GI Engineering Solutions Ltd चा आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात तब्बल सहा पट परतावा दिला आहे. अर्थात, एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आता त्याला 6 लाख रुपये मिळाले असते. या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने 15 दिवसांत 100% गून अधिचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून जीआय इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 20 फेब्रुवारी 2023 रोजी हा शेअर 5.30 रुपयांवर होता. आज तो 23.75 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या केवळ 15 दिवसांतत या शेअरने 11 रुपयांवरून 22.65 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरने एका महिन्यात 137% एवढा परतावा दिला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)