Lokmat Money >शेअर बाजार > १ शेअरवर ४ शेअर्स फ्री, डिविडंडही देणार कंपनी; पाहा कधी आहे रेकॉर्ड डेट

१ शेअरवर ४ शेअर्स फ्री, डिविडंडही देणार कंपनी; पाहा कधी आहे रेकॉर्ड डेट

Goel Food Products Limited: शेअर बाजारातील या कंपनीनं बोनस शेअर्स आणि डिविडंडची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं आता विक्रमी तारीख जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:37 PM2024-07-20T15:37:58+5:302024-07-20T15:39:05+5:30

Goel Food Products Limited: शेअर बाजारातील या कंपनीनं बोनस शेअर्स आणि डिविडंडची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं आता विक्रमी तारीख जाहीर केली आहे.

Goel Food Products Limited will give 4 free shares on 1 share dividend also See when the record date is | १ शेअरवर ४ शेअर्स फ्री, डिविडंडही देणार कंपनी; पाहा कधी आहे रेकॉर्ड डेट

१ शेअरवर ४ शेअर्स फ्री, डिविडंडही देणार कंपनी; पाहा कधी आहे रेकॉर्ड डेट

Goel Food Products Limited: गोयल फूड प्रॉडक्ट्स लिमिटेडने बोनस शेअर्स आणि डिविडंडची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं आता विक्रमी तारीख जाहीर केली आहे. कंपनी प्रति शेअर ४ शेअर्सचा बोनस देत आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.

रेकॉर्ड डेट कधी?

३० मे रोजी दिलेल्या माहितीत कंपनीनं शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवर ४ शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. कंपनीनं लाभांशही जाहीर केला आहे. १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवर कंपनी ५० पैशांचा लाभांश देत आहे. कंपनीनं या लाभांशासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

कंपनीने बोनस इश्यूसाठी ३१ जुलै २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच या दिवशी ज्यांचं नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये आहे, त्यांनाच लाभांश आणि बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे. कंपनी पहिल्यांदाच लाभांश आणि बोनस शेअर्स देणार आहे. यापूर्वी कंपनीने कधीही लाभांश दिला नव्हता.

कंपनीची कामगिरी कशी?

गोयल फूड प्रॉडक्ट्स लिमिटेडचा शेअर शुक्रवारी १६३.३५ रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ११.६० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत १ वर्षात १२.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२३.४५ रुपये आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १२५.५० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ६१.५९ कोटी रुपये आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Goel Food Products Limited will give 4 free shares on 1 share dividend also See when the record date is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.