Join us

शेअर बाजारातील गुंतवणूकीला 'अच्छे दिन', सहा लाख काेटींनी गुंतवणूकदार श्रीमंत

By प्रसाद गो.जोशी | Published: May 29, 2023 10:46 AM

आगामी सप्ताह हा अनेक घटना, घडामोडींचा असला तरी बाजाराची दिशा मुख्यत: स्मॉलकॅप कंपन्या ठरविण्याची शक्यता दिसत आहे.

आगामी सप्ताह हा अनेक घटना, घडामोडींचा असला तरी बाजाराची दिशा मुख्यत: स्मॉलकॅप कंपन्या ठरविण्याची शक्यता दिसत आहे. या सप्ताहात सुमारे १७०० कंपन्यांचा निकाल जाहीर होणार असून, त्यामधील बहुतांश कंपन्या या स्मॉलकॅप असल्याने त्यांच्यावरच बाजाराची स्थिती ठरणार आहे. याशिवाय वाहनविक्रीची आकडेवारी, देशातील जीडीपी,  पीएमआयचा बाजारावर परिणाम हाेऊ शकताे.आगामी सप्ताहात बाजार वाढू शकताे. अमेरिकेत कर्जाची मर्यादा वाढविण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. त्याचा भारतीय बाजाराला फायदा मिळू शकतो.

बाजारातील उधाणामुळे भांडवलात भरीव वाढगतसप्ताहामध्ये भारतीय शेअर बाजार वाढल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलामध्ये सहा लाख सात हजार कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. सप्ताहाखेरीस एकूण बाजार भांडवल मूल्य २ कोटी ८२ लाख ६७ हजार ३५१.८८ कोटी रुपयांचे झाले आहे. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ६ लाख ७ हजार ४८६.३२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

परकीय वित्तसंस्था खरेदीदारमे महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ३७,३१६ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. ही खरेदी सहा महिन्यांमधील सर्वाधिक ठरली आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत वित्तसंस्थाही खरेदी करताना दिसून आल्या. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक