Lokmat Money >शेअर बाजार > तुम्हालाही मिळालाय का Utkarsha Small Finance बँकेचा शेअर? अशा प्रकारे करा चेक

तुम्हालाही मिळालाय का Utkarsha Small Finance बँकेचा शेअर? अशा प्रकारे करा चेक

IPO मधील शेअर्सचं अलॉटमेंट बुधवारी अंतिम करण्यात आलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:52 AM2023-07-20T11:52:41+5:302023-07-20T11:55:28+5:30

IPO मधील शेअर्सचं अलॉटमेंट बुधवारी अंतिम करण्यात आलं. 

got share of Utkarsh Small Finance Bank ipo Check allotment status step by step procedure | तुम्हालाही मिळालाय का Utkarsha Small Finance बँकेचा शेअर? अशा प्रकारे करा चेक

तुम्हालाही मिळालाय का Utkarsha Small Finance बँकेचा शेअर? अशा प्रकारे करा चेक

Utkarsh Small Finance Bank Share allotment Status : जर तुम्ही उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओमध्ये (Utkarsh Small Finance Bank IPO) मध्ये पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला शेअर्स अलॉट झाले की नाही याची माहिती पाहता येईल. IPO मधील शेअर्सचं अलॉटमेंट बुधवारी अंतिम करण्यात आलं. 

ज्या लोकांनी बँकेच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली आहे ते बीएसई आणि एनएसईच्या वेबसाइट किंवा आयपीओ रजिस्ट्रार पोर्टलला भेट देऊन त्यांचं अलॉटमेंट स्टेटस तपासू शकतात. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 24 जुलै रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील.

111 पट झाला होता सबस्क्राईब
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा भरघोस पाठिंबा मिळाला. हा आयपीओ 111 पट सबस्क्राइब झाला. तज्ज्ञांनी या आयपीओला धमाकेदार लिस्टिंग मिळण्याची शक्यता व्यक्त केलीये. बँकेचा आयपीओ 12 ते 14 जुलै दरम्यान आला होता. त्याची किंमत 23-25 ​​रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. यामध्ये लॉट साइज 600 शेअर्सचा होता. तर गुंतवणूकदारांना किमान 15000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. बँकेचे शेअर्स 24 जुलै रोजी शेअर बाजारात लिस्ट होऊ शकतात. वाराणसी स्थित असलेली ही स्मॉल फायनान्स बँक 2016 मध्ये सुरू झाली.

एनएससीच्या वेबसाईटवर कसं पाहाल?

स्टेप 1. NSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://www.nseindia.com/.
स्टेप 2. पुढील पेजवर तुम्हाला 'इक्विटी'चा पर्याय दिसेल. तो निवडा आणि ड्रॉपडाउनमधून 'उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO' निवडा.
स्टेप 3. जेव्हा पेज ओपन होईल, तेव्हा तुमचा अर्ज क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक भरा आणि सबमिट करा.
स्टेप 4. 'I am not a robot' ला व्हेरिफाय करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
स्टेप 5. आता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO शेअर अलॉटमेंट स्टेटस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला शेअर्स अलॉट झालेत की नाही याची माहिती मिळेल.

रजिस्ट्रार पोर्टलवर कसं पाहाल?

स्टेप 1. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे रजिस्ट्रार KFintech आहेत. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती या लिंकवर तपासू शकता - https://ris.kfintech.com/iposatus/
स्टेप 2. येथे तुम्हाला 5 लिंक दिसतील जिथून तुम्ही तुमचं अलॉटमेंट स्टेटस तपासू शकता.
स्टेप 3. 5 पैकी कोणतीही एक लिंक उघडल्यानंतर, IPO मधील ड्रॉपडाउन मेनूमधून उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक निवडा.
स्टेप 4. अलॉटमेंट स्टेटस तपासण्यासाठी आता तुम्ही अर्ज क्रमांक, डिमॅट खाते आणि पॅन यापैकी एक निवडू शकता.
स्टेप 5. जर तुम्ही अर्ज क्रमांक निवडला असेल, तर तो त्या ठिकाणी एन्टर करा आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
स्टेप 6. तुम्ही डिमॅट खाते निवडलं असल्यास, तुमचे खात्याची माहिती एन्टर करा आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
स्टेप 7. यानंतर तुम्हाला तुमच्या शेअर्सचं अलॉटमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

Web Title: got share of Utkarsh Small Finance Bank ipo Check allotment status step by step procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.