Join us  

सरकारी कंपनीनं केली डिविडंटची घोषणा, शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; जबरदस्त तिमाही निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 1:10 PM

शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सरकारी कंपनी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (Concor) शेअर्समध्ये शुक्रवारी 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ तिचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर दिसून आली आहे. या सरकारी कंपनीनं या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला आहे.कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं शेअर बाजारांना यासंदर्भातील माहिती दिली. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत महसूल 2194 कोटी रुपये झाला आहे. जे गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी अधिक आहे. त्याच वेळी, जुलै ते सप्टेंबर दरम्यान, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा निव्वळ नफा 21 टक्क्यांनी वाढून 367 कोटी रुपये झाला आहे.डिविडेंटची रेकॉर्ड डेटकंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं शेअर बाजाराला कळवलं आहे की पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 3 रुपये दराने अंतरिम लाभांश दिला जाईल. याचा अर्थ, पात्र गुंतवणूकदारांना 5 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या स्टॉकवर 60 टक्के नफा मिळेल. कंपनीने लाभांशासाठी 16 नोव्हेंबर 2023 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.कशी होती कंपनीची कामगिरीशुक्रवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह 716.90 रुपयांवर बंद झाले. गेल्या 6 महिन्यांत, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजारसरकार