शेअर बाजारात सरकारी कंपनी इरेडाच्या शेअरची धूम सुरू आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेन्ट एजन्सी (इरेडा)चा शेअर गुरुवारी 15 टक्क्यांच्या तेजीसह 68.91 रुपयांवर पहोचला. केवळ दोन दिवसांतच कंपनीचा शेअर 115 टक्क्यांनी वधारला आहे. खरे तर, गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये इरेडाचा शेअर केवळ 32 रुपयांना मिळाला होता आणि आता तो 68.91 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात, इरेडाच्या (IREDA) आयपीओमध्ये पैसा गुंतवणाऱ्या गुंतवणूकदरांचा पैसा दोन दिवसांतच दुप्पटहून अधिक वाढला आहे.
IPO मध्ये 32 रुपयांना मिळाला कंपनीचा शेअर -
सरकारी कंपनी इरेडाच्या आयपीओचा प्राइस बँड 30-32 रुपये एवढा होता. आयपीओमध्ये कंपनीचा शेअर 32 रुपयांना अॅलॉट झाला होता. इरेडाचा शेअर 29 नोव्हेंबर 2023 रोजी 50 रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगनंतर, कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आणि तो 59.99 रुपयांवर बंद झाला होता. यानंतर हा शेअर गुरुवारी 68.91 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेन्ट एजन्सीचा (इरेडा) आयपीओ एकूण 38.80 पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आईपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचा कोटा 7.73 पट सब्सक्राइब झाला. तसेच, नॉन-इंस्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा कोटा 24.16 पट सब्सक्राइब झाला. सर्वांची क्वॉलीफाइड इंस्टिट्यूशनल बायर्स (QIB) कॅटेगिरीमध्ये 104.57 पट गुंतणूक झाली. कंपनीच्या आयपीओमध्ये एंप्लॉइजचा कोटा 9.80 पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इनव्हेस्टर्स कमितकमी 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी गुंतवणूक करू शकत होते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)