Hindustan Zinc Stake Sell : सरकारनं आपल्या एका कंपनीतील हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थान झिंकमधील (HZL) २.५ टक्के हिस्सा सरकार ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) ५०५ रुपये प्रति शेअर या फ्लोअर प्राइसवर विकणार आहे. या हिस्स्याच्या विक्रीतून सरकारला पाच हजार कोटींहून अधिक रक्कम मिळेल. दोन दिवस चालणारा ओएफएस इन्स्टिट्युशनल बिडर्ससाठी बुधवारी आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी गुरुवारी खुला होईल.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे याची माहिती दिली. हिंदुस्थान झिंक लिमिटेडमधील (एचझेडएल) ऑफर फॉर सेल ऑफर बुधवारी नॉन रिटेल इनव्हेस्टर्ससाठी खुला होईल. किरकोळ गुंतवणूकदार गुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी बोली लावू शकतात. सरकार १.२५ टक्के इक्विटी विकणार आहे, ज्यामध्ये 'ग्रीनशू' पर्यायांतर्गत अतिरिक्त १.२५ टक्के अधिक हिस्सा विकण्याचाही पर्याय असेल.
Offer for Sale in Hindustan Zinc Limited (HZL) opens tomorrow for Non-Retail investors. Retail investors can bid on Thursday, 7th November. Government will divest 1.25% equity with an additional 1.25% as green shoe option. pic.twitter.com/MIwdujPGzy
— Secretary, DIPAM (@SecyDIPAM) November 5, 2024
सरकार ५.२८ कोटी शेअर्स म्हणजेच १.२५ टक्के हिस्सा विकत आहे, ज्यात तेवढ्याच रकमेचा ग्रीनशू पर्याय आहे. ग्रीनशू पर्यायाचा अर्थ असा आहे की अधिक खरेदीदार असल्यास सरकार आणखी १.२५ टक्के हिस्सा विकू शकते. मंगळवारच्या ५५९.४५ रुपयांच्या बंद किमतीपेक्षा कमी ही किंमत ९.७ टक्क्यांनी कमी आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)