Lokmat Money >शेअर बाजार > विश्वास बसणार नाही; 'या' IPO ने पहिल्याच दिवशी करुन दिली 3 लाख रुपयांची कमाई

विश्वास बसणार नाही; 'या' IPO ने पहिल्याच दिवशी करुन दिली 3 लाख रुपयांची कमाई

कंपनीचा शेअर बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवसी गुंतवणूकदारांनी बंपर कमाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:20 PM2023-10-11T14:20:02+5:302023-10-11T14:20:53+5:30

कंपनीचा शेअर बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवसी गुंतवणूकदारांनी बंपर कमाई केली.

Goyal Salt Listing: Unbelievable; This IPO made a revenue of Rs 3 lakh on the first day | विश्वास बसणार नाही; 'या' IPO ने पहिल्याच दिवशी करुन दिली 3 लाख रुपयांची कमाई

विश्वास बसणार नाही; 'या' IPO ने पहिल्याच दिवशी करुन दिली 3 लाख रुपयांची कमाई

Goyal Salt Listing: शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची असले, पण कधी-कधी एखादा स्टॉक गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन देतो. आज आम्ही अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत. मीठ उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना एका दिवसात तिप्पट फायदा करुन दिला. कंपनीच्या IPO मध्ये ज्यांना शेअर्स अलॉट झाले होते, त्यांनी प्रचंड नफा मिळवला. 

आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, तिचे नाव 'गोयल सॉल्ट लिमिटेड' आहे. या मीठ उत्पादक कंपनीचे शेअर्स बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाले. गोयल सॉल्टचे शेअर्स NSE SME वर 130 रुपये प्रति शेअर, या दराने लिस्ट झाले आहेत. पण, IPO ची किंमत प्रति शेअर फक्त 38 रुपये होती. IPO प्राइस बँडनुसार, या कंपनीने 242% प्रीमियमने शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला आहे.

IPO ची नेत्रदीपक कामगिरी
लिस्टिंग झाल्यानंतर शेअरमध्ये झपाट्याने वाढ सुरूच आहे. लिस्ट झाल्यापासून गोयल सॉल्ट लिमिटेडचे ​​शेअर्स 5 टक्क्यांच्या वर आले आहेत. NSE वर शेअर सध्या 136.50 रुपयांवर व्यवहार करत आहे. या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदाराला एका लॉटसाठी 114,000 रुपये गुंतवावे लागले. तर, लिस्टिंगच्या दिवशीच या आयपीओने 4 लाख रुपयांपेक्षा जास्तीचा परतावा दिला. म्हणजेच या IPO ने गुंतवणूकदारांना एका दिवसात तिप्पट नफा दिला आहे. 

गोयल सॉल्ट आयपीओ हा एक एसएमई आयपीओ आहे, हा आयपीओ 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत खुला होता. या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. गोयल सॉल्टचा IPO एकूण 294.61 वेळा सबस्क्राइब झाला. तर किरकोळ श्रेणीत 377.97 पट भरला. या IPO चा आकार फक्त 18.63 कोटी रुपये होता. या इश्यूद्वारे कंपनीने नवीन 49.02 लाख शेअर जारी केले. आयपीओची किंमत 36 ते 38 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. कंपनीने IPO सुरू होण्यापूर्वी 25 सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून 5 कोटी रुपये उभे केले होते.

कंपनी काय करते
ही राजस्थानस्थित कंपनी कच्चे मीठ तयार करते, जे औद्योगिक मीठ आणि खाद्य मीठ म्हणूनही वापरले जाते. साबण आणि डिटर्जंट उद्योग, रासायनिक उद्योग आणि कापड आणि डाईंग, काच, प्लास्टिक, रबर, पॉलिस्टर आणि चामड्याचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांनाही औद्योगिक मीठाचा पुरवठा करते.

(टीप- आम्ही शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा आवश्य सल्ला घ्या.)

Web Title: Goyal Salt Listing: Unbelievable; This IPO made a revenue of Rs 3 lakh on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.