Join us

कंपनीला मिळालं ७०० कोटी रुपयांचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदाऱ्यांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 1:07 PM

एका नव्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

Stock Market Dividend Stock : एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या (H.G. Infra Engineering Ltd) शेअर्समध्ये शुक्रवारी कामकाजादरम्यान ७ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली होती. एका नव्या वृत्तानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. एच जी इन्फ्राचे शेअर्स ९१५.२० रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते.

का आली तेजी?

मध्य रेल्वेच्या एका प्रोजक्टसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी बनली असल्याचं त्यांनी शेअर बाजाराला सांगितलं. मध्य रेल्वेच्या या प्रोजेक्टचं एकूण मूल्य ७४०.५४ कोटी रुपये आहे. परंतु कंपनीनं यासाठी ७१६.११ कोटी रुपयांची बोली लावली आहे. एच जी इन्फ्राला हे काम ३० महिन्यांच्या आत पूर्ण करावं लागणार आहे.

शेअर बाजारातील कामगिरी कशी?

गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ३७ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. तर ६ महिन्यांमध्ये कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. या शेअरनं गेल्या एका महिन्यामध्ये गुंतवणूकदारांना १० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिलेत. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १०१६.७५ रुपये आणि नीचांकी स्तर ६१९.१५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ५९८४.९९ कोटी रुपये आहे.

कंपनी नियमित कालावधीनंतर डिविंडंटही देते. २०१३ मध्ये कंपनीकडून १.२५ रुपयांचा डिविडंट देण्यात आला होता. २०२२ मध्ये त्यांनी १ रुपयांचा डिविंडट दिला होता.

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक