Lokmat Money >शेअर बाजार > ₹138 वरुन ₹10 वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदार तुटून पडले; लागले अप्पर सर्किट...

₹138 वरुन ₹10 वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदार तुटून पडले; लागले अप्पर सर्किट...

ऑगस्ट 2024 मध्ये 138.50 रुपयांवर असणारा शेअर आज 10.82 रुपयांवर का आला? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 07:15 PM2024-11-18T19:15:14+5:302024-11-18T19:16:18+5:30

ऑगस्ट 2024 मध्ये 138.50 रुपयांवर असणारा शेअर आज 10.82 रुपयांवर का आला? जाणून घ्या...

'Ha' share falls to ₹10 from ₹138, now investors are torn; The upper circuit... | ₹138 वरुन ₹10 वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदार तुटून पडले; लागले अप्पर सर्किट...

₹138 वरुन ₹10 वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदार तुटून पडले; लागले अप्पर सर्किट...

Share Market Starlineps Enterprises Ltd. :शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी, या दोन्ही निर्देशांमध्ये आजही घसरण पाहायला मिळाली. मात्र, यादरम्यान असे काही शेअर्सही आहेत, ज्यात अशा परिस्थितीतही सर्किट लागले आहे. असाच एक शेअर Starlineps Enterprises Ltd. चा आहे. आज या शेअरला 5% अप्पर सर्किट लागले. मोठी गोष्ट म्हणजे, एकेकाळी या शेअरची किंमत 138 रुपयांपेक्षा जास्त होती. एवढ्या मोठ्या तोट्यानंतरही गुंतवणूकदारांना आज या शेअरमध्ये रस का आला? जाणून घेऊ...

महसूल दुप्पट झाला
हिरे आणि दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या Starlineps Enterprises Ltd. कंपनीने 2024-25 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत 3.25 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. याशिवाय कंपनीचा महसूलही दुपटीने वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिमाहीत 9.07 कोटी रुपयांच्या तुलनेत यावेळी तो वाढून 24.43 कोटी रुपये झाला आहे.

शेअर 138 रुपयांवरून 10 रुपयांवर कसे आले?
2 ऑगस्ट 2024 रोजी Starlineps Enterprises Limited च्या एका शेअरची किंमत 138.50 रुपये होती. पण, आज या शेअरची किंमत 10.82 रुपये आहे. आता हे कसे घडले ते समजून घेऊ. कंपनीने अलीकडेच 1:5 चा बोनस जारी केला होता. याशिवाय कंपनीने प्रति शेअर 5 रुपये ते 1 रुपये स्टॉक स्प्लिटलाही मान्यता दिली होती. यामुळे शेअरचा भाव थेट 69.04 रुपयांवरून 14.50 रुपयांवर गेला. यानंतर त्यातही घट झाली आणि शेअर 10 रुपयांच्या खाली गेला.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: 'Ha' share falls to ₹10 from ₹138, now investors are torn; The upper circuit...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.