Lokmat Money >शेअर बाजार > HAL Share Price : ₹२६००० ची मिळाली ऑर्डर; एक्सपर्ट म्हणाले, ₹६००० पर्यंत जाऊ शकतो डिफेन्स शेअर

HAL Share Price : ₹२६००० ची मिळाली ऑर्डर; एक्सपर्ट म्हणाले, ₹६००० पर्यंत जाऊ शकतो डिफेन्स शेअर

HAL Share Price : कंपनीचा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांहून अधिक वाढून ४९२५ रुपयांवर पोहोचला. मात्र यानंतर तो ४८३७ रुपयांवर आला. मोठी ऑर्डर मिळाल्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 12:41 PM2024-09-03T12:41:55+5:302024-09-03T12:42:16+5:30

HAL Share Price : कंपनीचा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांहून अधिक वाढून ४९२५ रुपयांवर पोहोचला. मात्र यानंतर तो ४८३७ रुपयांवर आला. मोठी ऑर्डर मिळाल्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. 

HAL Share Price Total order of rs 26000 sukhoi Defence share can go above rs 6000 experts said buy rating | HAL Share Price : ₹२६००० ची मिळाली ऑर्डर; एक्सपर्ट म्हणाले, ₹६००० पर्यंत जाऊ शकतो डिफेन्स शेअर

HAL Share Price : ₹२६००० ची मिळाली ऑर्डर; एक्सपर्ट म्हणाले, ₹६००० पर्यंत जाऊ शकतो डिफेन्स शेअर

HAL Share Price : एअरोस्पेस अँड डिफेन्स कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL Share Price Today) शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. एचएएलचा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांहून अधिक वाढून ४९२५ रुपयांवर पोहोचला. मात्र यानंतर तो ४८३७ रुपयांवर आला. मोठी ऑर्डर मिळाल्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. 

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून २४० एएल-३१ एफपी एअरो इंजिन खरेदी करण्यास मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीनं मंजुरी दिली आहे. कंपनीला मिळालेल्या या ऑर्डरची किंमत २६००० कोटी रुपये आहे. या ऑर्डरनुसार एरो इंजिनची डिलिव्हरी एका वर्षानंतर सुरू होईल आणि ती ८ वर्षात पूर्ण होईल.

६००० रुपयांपार जाऊ शकतो शेअर

एचएएलचे शेअर्स ६००० रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंग हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे. ब्रोकरेज हाऊसने डिफेन्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंगनं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्ससाठी ६१४५ रुपयांचं टार्गेट प्राइस दिलं आहे. या ऑर्डरमुळे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा ऑर्डर बॅकलॉग आणखी बळकट होईल, असं ब्रोकरेज फर्मचं म्हणणं आहे. आर्थिक वर्ष २०२४ अखेर ऑर्डर बॅकलॉग ९४,००० कोटी रुपये होता, जो आता १.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

वर्षभरात १५० टक्क्यांहून अधिक वाढ

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) शेअरमध्ये गेल्या वर्षभरात १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ४ सप्टेंबर २०२३ रोजी एअरोस्पेस अँड डिफेन्स कंपनीचा शेअर १९८१.७८ रुपयांवर होता. ३ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४९२५ रुपयांवर पोहोचला. तर एचएएलच्या शेअर्समध्ये या वर्षी आतापर्यंत ७५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी एचएएलचे शेअर्स २८२६.९५ रुपयांवर होते, जे ३ सप्टेंबर २०२४ रोजी ४९०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. 

गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५६७५ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १७६७.९५ रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: HAL Share Price Total order of rs 26000 sukhoi Defence share can go above rs 6000 experts said buy rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.