Lokmat Money >शेअर बाजार > हरियाणा सरकारनं दिली ₹358 कोटींची ऑर्डर, रॉकेट बनला कंपनीचा शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

हरियाणा सरकारनं दिली ₹358 कोटींची ऑर्डर, रॉकेट बनला कंपनीचा शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

कंपनीचा शेअर जवळपास 20 टक्क्यांनी वधारून 861.35 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरमध्ये ही तेजी एका बातमीमुळे आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 02:30 PM2023-08-30T14:30:49+5:302023-08-30T14:32:33+5:30

कंपनीचा शेअर जवळपास 20 टक्क्यांनी वधारून 861.35 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरमध्ये ही तेजी एका बातमीमुळे आली आहे.

Haryana government placed an order worth rs358 crore, the Shakti Pumps India Ltd Share became a rocket | हरियाणा सरकारनं दिली ₹358 कोटींची ऑर्डर, रॉकेट बनला कंपनीचा शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

हरियाणा सरकारनं दिली ₹358 कोटींची ऑर्डर, रॉकेट बनला कंपनीचा शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

शेअर बाजारात आज शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे. कंपनीचा शेअर जवळपास 20 टक्क्यांनी वधारून 861.35 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरमध्ये ही तेजी एका बातमीमुळे आली आहे. कंपनीने शेअर बाजाराला एक ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली आहे.

हरियाणा सरकारनं दिली ऑर्डर -
शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेडला हरियाणा सरकारकडून तब्बल 358 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला बुधवारी हरियाणा रिन्यूएबल एनर्जी डिपार्टमेंटकडून (हरेडा) 7,781 पंपांसाठी 358 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला कुसुम-3 योजनेअंतर्गत पहिली वर्क ऑर्डर मिळाली आहे. या घोषणेनंतर शअरमध्ये जबरदस्त खरेदी सुरू आहे. 

पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा तथा उत्थान महाअभियान (पीएम-कुसुम) 2019 मध्ये कंपन्यांकडून नापीक जमिनीवर 10,000 मेगावॅट विकेंद्रित ग्रीड कनेक्टेड रिन्यूएबल वीजेचा प्रकल्प उभारण्यासाठी सुरू करण्यात आले होते. या घटकानुसार, शेतकरी/सहकारी समित्या/पंचायतींद्वारे 500 किलोवॅट ते 2 मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा आधारित वीज प्रकल्प (REPPs) उभारले जातील.

Web Title: Haryana government placed an order worth rs358 crore, the Shakti Pumps India Ltd Share became a rocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.