Join us

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका; होम लोन, पर्सनल लोन, कार लोनचे EMI वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 5:36 PM

एचडीएफसी बँकेनं पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा झटका दिलाय. बँकेनं कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

एचडीएफसी बँकेनं पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा झटका दिलाय. बँकेनं कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेनं बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) मध्ये निवडक कालावधीसाठी 15 बेसिस पॉईंट्स पर्यंत वाढ केली आहे. अशा परिस्थितीत, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग लोनचा ईएमआय वाढेल.

एमसीएलआर ठरवताना अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. यामध्ये डिपॉझिट रेट, रेपो रेट, ऑपरेटिंग कॉस्ट आणि कॅश रिझर्व्ह रेशो राखण्याची किंमत यांचा समावेश होतो. रेपो दरातील बदलाचा एमएलसीआर दरावर परिणाम होतो. एमएलसीआर मधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्याचा अर्थ कर्जदाराच्या ईएमआयमध्ये वाढ होते. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन एमएलसीआर दर 7 जुलै 2023 पासून लागू केले गेले आहेत.

काय आहेत नवे दर?

  • HDFC बँकेचा ओव्हरनाईट एमएलसीआर 15 बीपीएसनं वाढून 8.10 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आलाय.
  • एक महिन्याचा एमएलसीआर 10 बेसिस पॉईंट्सनं वाढून 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्के केलाय.
  • तीन महिन्यांचा एमएलसीआरदेखील पूर्वीच्या 8.50 टक्क्यांवरून 10 बेसिस पॉइंट्सनं वाढवून 8.60 करण्यात आलाय.
  • सहा महिन्यांचा एमएलसीआर पूर्वीच्या 8.85 टक्क्यांवरून 5 बेसिस पॉईंट्सनं वाढून 8.90 टक्के झाला.
  • एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर 9.05 टक्के आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाही. 

ईएमआय वाढणारएमएलसीआर मधील वाढीचा परिणाम होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनसह त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरावर दिसून येईल. विद्यमान कर्जदारांना जास्त ईएमआय भरावे लागतील, तर नवीन कर्जदारांना जास्त व्याजदरानं कर्ज घ्यावं लागेल.

टॅग्स :एचडीएफसी