Join us  

HDFC ने केले मालामाल; अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी केली ₹ 32000 कोटींची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 2:39 PM

HDFC Bank Market Value Rise : गेल्या आठवड्यात एचडीएफसीचे शेअर्स 1658.05 रुपयांवर पोहोचले.

HDFC Bank Market Value Rise : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या सेन्सेक्स निर्देशांकातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 8 च्या बाजार मूल्यात मोठी घसरण झाली. पण यादरम्यान देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC बँकेने दमदार कामगिरी केली. यामुळे बँकेच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या 5 दिवसांत सुमारे 32,000 कोटी रुपये कमावले.

TCS आणि Infosys चे मोठे नुकसान गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 350.77 अंकांनी किंवा 0.43 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे सेन्सेक्सच्या टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे मार्केट कॅप झपाट्याने घसरुन एकत्रितपणे 1,28,913.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या कालावधीत टाटा समूहाची आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी TCS आणि देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी Infosys यांना सर्वाधिक फटका बसला. याशिवाय रिलायन्स, आयटीसी, एसबीआय आणि एअरटेचे बाजारमूल्य लक्षणीयरित्या घटले. 

एचडीएफसी बँकेचे गुंतवणूकदार मालामालगेल्या आठवड्यात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे मालामाल झाले. पाच दिवसात बँकेचे बाजारमूल्य 32,759.37 कोटी रुपयांनी वाढून 12,63,601.40 कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसीनेही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. LIC चे मार्केट कॅप पाच दिवसांत रु. 1,075.25 कोटींनी वाढून रु. 7,47,677.98 कोटींवर पोहोचला आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक