Lokmat Money >शेअर बाजार > HDFCचं मर्जर गुंतवणूकदारांना फळलं, शेअरमध्ये तुफान उसळी; स्टॉक उच्चांकी पातळीवर

HDFCचं मर्जर गुंतवणूकदारांना फळलं, शेअरमध्ये तुफान उसळी; स्टॉक उच्चांकी पातळीवर

मर्जरनंतर एचडीएफसी बँक जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 12:00 PM2023-07-03T12:00:27+5:302023-07-03T12:01:13+5:30

मर्जरनंतर एचडीएफसी बँक जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक ठरली आहे.

hdfc merger pays off for investors stock surges Stocks at 52 weeks high levels investors huge profit | HDFCचं मर्जर गुंतवणूकदारांना फळलं, शेअरमध्ये तुफान उसळी; स्टॉक उच्चांकी पातळीवर

HDFCचं मर्जर गुंतवणूकदारांना फळलं, शेअरमध्ये तुफान उसळी; स्टॉक उच्चांकी पातळीवर

नुकतंच एचडीएफसी आणि एचडीएफसी लिमिटेडचं मर्जर पूर्ण झालं. या मर्जरनंतर एचडीएफसी बँक जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक ठरली आहे. पण या मर्जरनं गुंतवणूकदारदेखील सुखावले आहेत. एचडीएफसी बँकेच्या शेअर्स मध्ये सोमवारी तुफान उसळी दिसून आली. यासोबतच बँकेचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. सोमवारी सकाळी शेअर ५० रुपयांसह १७५१.९० रुपयांवर पोहोचला. हा आपल्या १७५५ रुपयांच्या आपल्या उच्चांकी स्तरापर्यंतही पोहोचला होता. येत्या काळात हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्नही देण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये यापुढेही तेजी राहू शकते. यापुढेही कामगिरी चांगली राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांकडूनही चांगली खरेदी पाहायला मिळतेय. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचं मर्जर १ तारखेला पूर्ण झालंय. एच़डीएफसीच्या शेअरचं डिलिस्टिंग १३ जुलै रोजी होणारे. कंपनीचे शेअर्स या दिवसापासून शेअर बाजारातून डिलिस्ट होतील. याशिवाय संयुक्त कंपनीचे शेअर १७ जुलैपासून ट्रेड होती. याद्वारे एचडीएफसीला एचडीएफसी बँकेतील ४१ टक्के भागीदारी मिळेल.

शेअरधारकांना मिळणार शेअर 
एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या मर्जरनंतर आता गुंतवणूकदारांना शेअर्स दिले जातील. एचडीएफसीच्या २५ शेअर्सच्या मोबदल्यात एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर्स दिले जातील. जर तुमच्याकडे एचडीएफसी लिमिटेडचे १० शेअर्स असतील तर तुम्हाला मर्जर अंतर्गत १७ शेअर्स मिळतील. 

Web Title: hdfc merger pays off for investors stock surges Stocks at 52 weeks high levels investors huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.