Join us  

Hero Motors शेअर बाजारात धमाका करणार; ९०० कोटी रुपयांच्या IPO सह करणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 2:31 PM

Hero Motors DRHP: देशातील प्रमुख कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेला हीरो मोटर्स कंपनी ग्रुप लवकरच शेअर बाजारात नवा धमाका करणार आहे.

Hero Motors DRHP: देशातील प्रमुख कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेला हीरो मोटर्स कंपनी ग्रुप लवकरच शेअर बाजारात नवा धमाका करणार आहे. समूहाची ऑटो कंपोनंट निर्माता कंपनी हीरो मोटर्स ९०० कोटी रुपयांचा आयपीओ घेऊन येत आहे. प्रस्तावित आयपीओचा ड्राफ्ट बाजार नियामक सेबीकडे सादर करण्यात आला आहे.

आयपीओमध्ये ५०० कोटींचा नवा इश्यू

हीरो मोटर्सनं आपल्या प्रस्तावित आयपीओचा मसुदा २३ ऑगस्ट रोजी सेबीकडे सादर केला. आयपीओ ड्राफ्टनुसार, कंपनीनं बाजार नियामकाकडे केलेल्या प्रस्तावात ५०० कोटी रुपयांच्या शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि ४०० कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून कंपनीच्या प्रवर्तकांना आपला हिस्सा शेअर विकून कंपनीतील आपला हिस्सा कमी करायचा आहे.

ओएफएसमध्ये हे विकणार शेअर्स

हीरो मोटर्सला साऊथ एशिया ग्रोथ इन्व्हेस्टचा पाठिंबा आहे. आयपीओमध्ये कंपनीचे प्रवर्तक ओपी मुंजाल होल्डिंग्स आयपीओमधील आपला हिस्सा विकून २५० कोटी रुपये उभे करण्याची योजना आखत आहेत. याशिवाय भाग्योदय इन्व्हेस्टमेंट्स आणि हीरो सायकल्स या दोन्ही कंपन्या ओएफएसमधील ७५ ते ७५ कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत.

यांचा आहे हिस्सा

सध्या हीरो मोटर्समध्ये प्रवर्तक ओपी मुंजाल होल्डिंग्सचा सर्वाधिक ७१.५५ टक्के हिस्सा आहे. भाग्योदय इन्व्हेस्टमेंटची ६.२८ टक्के आणि हीरो सायकल्सची २.०३ टक्के हिस्सा आहे. हीरो मोटर्समध्ये साऊथ एशिया ग्रोथ इन्व्हेस्ट एलएलसीचा १२.२७ टक्के हिस्सा आहे.

बीएमडब्ल्यू, डुकाटी देखील ग्राहक

ही कंपनी इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक अशा दोन्ही पॉवरट्रेनची निर्मिती करते. त्याच्या ग्राहकांमध्ये अमेरिका, युरोप, भारत आणि आसियानमधील अनेक ओईएमचा समावेश आहे. बीएमडब्ल्यू, डुकाटी, एनिलो इंटरनॅशनल, फॉर्म्युला मोटरस्पोर्ट, हमिंगबर्ड ईव्ही, एचडब्ल्यूए यांसारख्या बड्या ग्राहकांचा यात समावेश आहे. जागतिक ई-बाइक कंपन्यांसाठी सीव्हीटी तयार करणारी हीरो मोटर्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे. कंपनीचे भारत, ब्रिटन आणि थायलंडमध्ये ६ उत्पादन प्रकल्प आहेत.

भारतीय बाजारात आयपीओंचा बोलबाला

हीरो मोटर्सचा आयपीओ अशा वेळी येत आहे जेव्हा भारतीय शेअर बाजारात आयपीओंचा बोलबाला आहे. अनेक दशकांनंतर ऑटो सेक्टरचा पहिला आयपीओ नुकताच आला आहे, जो ओला इलेक्ट्रिकनं आणलाय. दक्षिण कोरियन वाहन कंपनी ह्युंदाई देखील आपल्या भारतीय युनिटचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार