Join us

रतन टाटांच्या सर्वात मोठ्या कंपनीचे रेकॉर्ड तुटणार? २० वर्षानंतर शेअर बाजारात घडणार मोठी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:12 IST

Hexaware Technology : दिवंगत रतन टाटा यांची सर्वात मोठी कंपनीचा रेकॉर्ड पुढील आठवड्यात तुटणार आहे. पुढील आठवड्यात शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ येत आहे.

Hexaware Technology : गेल्या ३ महिन्यांपासून शेअर बाजारात सापशिडीचा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी कोणता शेअर वर जाईल आणि कोणता भुईसपाट होईल काही सांगता येत नाही. सप्टेंबर महिन्यात ऐतिहासिक पातळीवर असलेला बाजार सध्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. अशा परिस्थिती पुढच्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. कारण बाजारातील २० वर्ष जुना विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटांची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा रेकॉर्ड मोडू शकतो. वास्तविक,  १२ फेब्रुवारी रोजी देशातील सर्वात मोठा IT क्षेत्रातील IPO बाजारात येणार आहे, ज्याचा इश्यू साइज TCS च्या इश्यू साइजच्या बरोबरीचा आहे.

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर आयटी क्षेत्रातील मरगळ काहीशी दूर झालेली दिसली. मात्र, पुढील आठवडा या क्षेत्रासाठी खास असेल. मुंबईस्थित IT कंपनी हेक्सावेअर टेक्नोलॉजी १२ फेब्रुवारी रोजी आपला IPO बाजारात आणत आहे. हा IT क्षेत्रातील सर्वात मोठा IPO असणार आहे. यापूर्वी २००४ मध्ये TCS कंपनीच्या इश्यूचा आकार ४,७१३ कोटी रुपये होता. त्या तुलनेत हेक्सावेअर टेक्नोलॉजीच्या इश्यूचा साईज जवळजवळ दुप्पट आहे. हेक्सावेअर टेक्नोलॉजीचे आपल्या IPO मधून ८,७५० कोटी उभारणार आहे.

हेक्सावेअर टेक्नोलॉजीचा आयपीओ कसा असेल?हेक्सावेअर टेक्नोलॉजीचा आयपीओ पुढील आठवड्यात १२ फेब्रुवारी रोजी बाजारात उघडणार आहे. गुंतवणूकदार यामध्ये १४ फेब्रुवारीपर्यंत बोली लावू शकतील. कंपनी आयपीओद्वारे ८,७५० कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने आपल्या आयपीओची किंमत ६७४-७०८ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. हा आयपीओ पूर्णपणे ओएफएसवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रवर्तक कार्लाइल आपला हिस्सा विकत आहे. विक्रीनंतर कार्लाइल यांची हिस्सेदारी सध्याच्या ९५ टक्क्यांवरून ७४.१ टक्के कमी होईल. किरकोळ गुंतवणूकदार या इश्यूमध्ये किमान २१ शेअर्ससाठी बोली लावू शकतात, ज्यासाठी त्यांना किमान १४,८६८ रुपयांची आवश्यकता असेल.

हेक्सावेअर ५ वर्षांनी पुन्हा मैदानातजर आपण हेक्सावेअरच्या जीएमपीबद्दल बोललो तर तो सध्या ११ रुपयांवर चालत आहे. याचा अर्थ असा की हा आयपीओ ७१९ रुपयांना लिस्ट केला जाऊ शकतो, जो सुमारे दीड टक्के लिस्टिंग गेन असेल. कंपनीकडे पाहिले तर हेक्सावेअर पाच वर्षांनंतर दलाल स्ट्रीटवर परत येत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कंपनी डिलिस्टिंगद्वारे शेअर बाजारातून बाहेर पडली होती. प्रवर्तकांनी ४७५ रुपये प्रति शेअरची डीलिस्टिंग किंमत स्वीकारली होती.

टॅग्स :रतन टाटाटाटाशेअर बाजारशेअर बाजार