Join us  

1988 मध्ये झालेली SEBI ची स्थापना; संस्था नेमके काय काम करते? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 2:53 PM

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने आपल्या नवीन अहवालात अदानी समूह आणि SEBI प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.

Hindenberg Report on SEBI : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या नवीन अहवालात अदानी समूह आणि SBI प्रमुख माधबी पुरी-बुच यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा केला आहे. मात्र, माधबी पुरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, या अहवालामुळे विरोधकांना केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवीन मुद्दा सापडला आहे. आता अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडला असेल की, SEBI आहे तरी काय आणि संस्थेचे काम कसे चालते? 

"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल

SEBI शेअर बाजारावर पाळत ठेवतेसिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ही भारतातील प्रमुख नियामक संस्था आहे. ही भारतीय शेअर बाजार आणि इतर सिक्युरिटीज बाजारांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवते. सेबीचे मुख्य उद्दिष्ट गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे, व्यापाराची पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे हे आहे. SEBI ची स्थापना भारत सरकारने 12 एप्रिल 1988 रोजी केली होती. पण, 30 जानेवारी 1992 रोजी त्याला कायदेशीर अधिकार आणि स्वायत्तता मिळाली. संस्थेचे मुख्यालय मुंबईत आहे, तर दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालये आहेत.

सेबीच्या अध्यक्षाची नियुक्ती भारत सरकार करते. अध्यक्ष हा SEBI चा सर्वात वरिष्ठ अधिकारी असतो, जो बोर्डाच्या सर्व कार्यांसाठी आणि धोरणांसाठी जबाबदार असतो. सेबी प्रमुखांव्यतिरिक्त, बोर्डात 3 ते 5 पूर्णवेळ सदस्य असतात. त्यांच्याकडे वित्तीय बाजारांचे नियमन करण्यासह अनेक जबाबदाऱ्या आहेत. याशिवाय सेबीमध्ये अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेकडून नामनिर्देशित दोन सदस्य असतात.

आमची बदनामी करण्याचा प्रयत्न; हिंडेनबर्गने केलेल्या नव्या आरोपांवर अदानी ग्रुपचे स्पष्टीकरण

SEBI चे काम काय आहे ?लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय शेअर बाजाराने इतिहास रचला होता. बाजार पहिल्यांदाच 5 ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये सामील झाला. तेव्हा भारत लवकरच जगातील सर्वात मोठी टॉप मार्केट बनेल, अशी अपेक्षा होती. सेबीचे काम गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आहे. सेबीला नियम बनवण्याचा अधिकार आहे. भांडवली बाजारातील व्यवसायाशी संबंधित हेराफेरी आणि फसवणूक रोखण्यासाठी देखील संस्था जबाबदार आहे. सेबीचे काम म्युच्युअल फंड सिक्युरिटीजची नोंदणी करणे आणि त्यांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवणे हे आहे. याशिवाय, नवीन कंपन्यांच्या सूचिबद्धतेमध्येही सेबी महत्त्वाची भूमिका बजावते.

काय आहेत हिंडेनबर्गचे आरोप?अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे. काही गुप्त कागदपत्रांचा हवाला देत हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले की, अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती. माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी 5 जून 2015 रोजी सिंगापूरमध्ये IPE प्लस फंड 1 मध्ये त्यांचे खाते उघडले होते. यामध्ये त्यांची एकूण गुंतवणूक 10 मिलियन डॉलर्स एवढी होती. हा ऑफशोअर मॉरिशस फंड अदानी ग्रुपच्या संचालकाने इंडिया इन्फोलाईनच्या माध्यमातून स्थापन केला होता. हा फंड टॅक्स हेवन असलेल्या मॉरिशसमध्ये रजिस्टर आहे, असे आपल्याला सापडलेल्या कागदपत्रांमध्ये दिसत असल्याचा दावा हिंडनबर्गने केला आहे. 

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर जबाबदार कोण? हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

दाम्पत्याने आरोप फेटाळून लावलेबुच दाम्पत्याने हिंडेनबर्गने केलेले आरोप फेटाळले आहेत. बुच म्हणाले की, त्यांनी 2015 मध्ये 360 वन ॲसेट अँड वेल्थ मॅनेजमेंट (पूर्वीचे IIFL वेल्थ मॅनेजमेंट) द्वारे व्यवस्थापित IPE प्लस फंड 1 मध्ये गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक त्यांनी सिंगापूरमध्ये खाजगी नागरिक म्हणून राहत असताना आणि माधवी बुच पूर्णवेळ सदस्य म्हणून सेबीमध्ये सामील होण्याच्या दोन वर्षांपूर्वी केली होती. हिंडेनबर्ग अहवालात केलेले आरोप निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही. 

अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळलेहिंडेनबर्ग रिसर्चच्या नव्या अहवालाबाबत अदानी समूहाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप चुकीचे असून वस्तुस्थितीशी छेडछाड करुन मांडण्यात आल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. शिवाय, आम्ही हिंडेनबर्गने आमच्यावर केलेले हे सर्व आरोप पूर्णपणे नाकारतो, हे आरोप फक्त आमची बदनामी करण्यासाठी लावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी केलेल्या या सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्यात आली असून, ते पूर्णपणे निराधार असल्याचे सिद्ध झाल्याचेही अदानी ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :सेबीशेअर बाजारशेअर बाजारगौतम अदानीअदानी