Lokmat Money >शेअर बाजार > 'या' कंपनीची अदानींच्या शेअर्समध्ये २५००० कोटींची गुंतवणूक, ITC वरही मोठी 'खेळी' २२ कोटी शेअर्स खरेदी केले

'या' कंपनीची अदानींच्या शेअर्समध्ये २५००० कोटींची गुंतवणूक, ITC वरही मोठी 'खेळी' २२ कोटी शेअर्स खरेदी केले

गेल्या तीन वर्षांत शेअर बाजाराने वेग घेतला असून या तेजीमध्ये काही समूहांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती निर्माण केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 04:04 PM2024-08-19T16:04:54+5:302024-08-19T16:05:06+5:30

गेल्या तीन वर्षांत शेअर बाजाराने वेग घेतला असून या तेजीमध्ये काही समूहांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती निर्माण केली आहे.

hindenburg adani saviour gqg partners buying in itc and adani group stocks huge holdings in some companies | 'या' कंपनीची अदानींच्या शेअर्समध्ये २५००० कोटींची गुंतवणूक, ITC वरही मोठी 'खेळी' २२ कोटी शेअर्स खरेदी केले

'या' कंपनीची अदानींच्या शेअर्समध्ये २५००० कोटींची गुंतवणूक, ITC वरही मोठी 'खेळी' २२ कोटी शेअर्स खरेदी केले

गेल्या तीन वर्षांत शेअर बाजाराने वेग घेतला असून या तेजीमध्ये काही समूहांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती निर्माण केली आहे. बाजारातील या तेजीच्या काळात रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप प्रथमच २० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलंय. या काळात बाजारात अनेक मोठ्या गोष्टीही शेअर बाजारात घडल्या.

मधल्या काळात हिडेनबर्गच्या अहवालामुळे अदानींचे शेअर्स उच्चांकावरून घसरले असले होते. तरी या घसरणीनंतर अदानी समूहातही लवकरच सुधारणा दिसून आली. रिकव्हरीदरम्यान अदानी समूहानं इन्स्टिट्युशनल खरेदी पाहिली, ज्यात सर्वात मोठं योगदान अमेरिकेतील गुंतवणूक फर्म जीक्यूजी पार्टनर्सचं आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये अदानी समूहावर हिंडेनबर्गचं वादळ घोंगावत असताना अदानींच्या चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर जीक्यूजीचा भारतीय पोर्टफोलिओ आता १३ शेअर्ससह सुमारे ९०,००० कोटी रुपयांवर पोहोचला होता. परंतु ट्रेंड लाइनवरील आकडेवारीनुसार तो आता ५०,००० कोटी रुपयांवर आला आहे. जीक्यूजी पार्टनर्स ही भारतीय बाजारपेठेतील अतिशय सक्रिय कंपनी आहे.

जीक्यूजी ठरलेले 'संकटमोचक'

अदानी समूहासाठी जीक्यूजी संकटमोचक ठरले होते. सर्वजणांकडून अदानींच्या शेअर्सची विक्री सुरू असताना ग्रुपनं या शेअर्समध्ये खरेदी केली. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जीक्यूचीचे अजूनही २५,००० कोटी रुपये आहेत.

असं असलं तरी भारतीय बाजारपेठेत जीक्यूजी पार्टनर्ससाठी आयटीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक होल्डिंग आहे. जीक्यूजीनं आयटीसीचे २२ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. या शेअरमध्ये जीक्यूजीची एकूण होल्डिंग व्हॅल्यू ११,२३० कोटी रुपये आहे. गेल्या तिमाहीपासून आयटीसीच्या शेअरच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी आयटीसी लिमिटेडचा शेअर ५०९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता, जो ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर होता.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: hindenburg adani saviour gqg partners buying in itc and adani group stocks huge holdings in some companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.