Join us  

हिंडनबर्गनं अदानी ग्रूपचं केलं मोठं नुकसान, कंपनी बॅकफूटवर; आता घ्यावा लागला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:47 AM

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या अहवालाचा अदानी ग्रूपवर मोठा परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली-अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या अहवालाचा अदानी ग्रूपवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या २० दिवसात कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यात अदानी समूहानं हिंडनबर्गविरुद्ध थेट कायदेशीर लढा देण्याची तयारी केल्यानं आपलं संपूर्ण लक्ष डॅमेज कंट्रोलकडे दिलं आहे. त्यामुळे कंपनीकडून कर्ज फेडण्यापासून रोख वाचवण्यावर भर दिला जात आहे. शेअर्सच्या किमती मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे कंपनीनं आता आपलं रेवेन्यू टार्गेट ४० टक्क्यांनी कमी करुन थेट अर्ध्यावर आणलं आहे. 

१५ ते २० टक्के वाढीचा अंदाजगेल्या महिन्यात २४ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये भूकंप आला होता. त्यामुळे कंपनीला दररोज कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागत आहे. आतापर्यंत कंपनीच्या एकूण मार्केट कॅपमध्ये ११७ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. 

शेअर्स पडल्यानं गौतम अदानींच्या नेटवर्थमध्येही मोठी घट झाली आणि अदानी श्रीमंतांच्या यादीतून थेट टॉप-२० बाहेर फेकले गेले आहेत. ब्लूमबगच्या रिपोर्टनुसार अदानी ग्रूपनं पुढील आर्थिक वर्षासाठी आपलं रेवेन्यू टार्गेट पूर्वलक्ष्यीत अंदाजाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी केलं असून थेट १५ ते २० टक्क्यांवर आणलं आहे. 

तारण शेअर्स सोडवण्याचा प्लानहिंडनबर्गच्या वादळानंतर अदानी ग्रूपनं मोठं प्लानिंग केलं आहे. यात कर्जाची परतफेड, रोख बचत, कॅपिटल एक्स्पेंडिचर प्लानमध्ये घट आणि तारण ठेवलेल्या शेअर्सची सुटका करणे अशा मार्गांचा अवलंब केला जात आहे. .रिपोर्टनुसार अदानी ग्रूपच्या तीन कंपन्यांनी बँकांकडे आपले अतिरिक्त शेअर्स तारण ठेवले आहेत. ते सोडवण्याचा प्लान कंपनीनं तयार केला आहे. तारण ठेवलेल्या शेअर्समध्ये अदानी पोर्ट, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे. 

हिंडनबर्ग विरोधात कायदेशीर लढाईची तयारीहिंडनबर्गच्या अहवालामुळे फटका बसल्यानंतर पुन्हा उभारी घेण्यासाठी अदानी ग्रूपनं आपल्या फायनान्शियल हेल्थला सुधारण्याची तयारी सुरू केली आहे. अदानी ग्रूपचं एक सामान्य ऑडिट करण्यासाठी बिग फोअर अकाऊंटिंग फर्ममधील एकाची नियुक्ती करण्याची तयारी केली जात आहे. याशिवाय हिंडनबर्ग फर्म विरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी अमेरिकन दिग्गज लॉ फर्म वॉचटेलची अदानी ग्रूपनं निवड केली आहे. 

आजही शेअर्समध्ये पडझडआठवड्याच्या पहिल्याच दिवशी अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये पडझडीचा सिलसिला सुरूच आहे. सकाळी बाजाराचे पहिले सत्र सुरू झाल्यानंतर अदानी पावरचे शेअर्स ४.९९ टक्क्यांनी कोसळून १५६ रुपयांवर आले. तर अदानी विल्मरचे शेअर्स १.४८ टक्क्यांनी कोसळून प्रतिशेअर ४२९.४५ रुपयांवर आला आहे. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ५ टक्क्यांनी कोसळला आहे. अदानी टोटल गॅसचा शेअर ५ टक्क्यांनी कोसळून प्रतिशेअरची किंमत १,१९२ रुपये इतकी झाली आहे. अदानी ट्रान्समिशनचा शेअर ५ टक्क्यांनी कोसळून प्रतिशेअर १,१२७ रुपयांवर ट्रेड करत आहे. 

टॅग्स :गौतम अदानी