Lokmat Money >शेअर बाजार > Hindustan Zinc share: पहिल्यांदा ₹१०, आता ₹१९; शेअरवर सातत्यानं डिविडेंड देतेय 'ही' कंपनी; रॉकेट बनला भाव

Hindustan Zinc share: पहिल्यांदा ₹१०, आता ₹१९; शेअरवर सातत्यानं डिविडेंड देतेय 'ही' कंपनी; रॉकेट बनला भाव

Hindustan Zinc share: या कंपनीच्या संचालक मंडळानं १९ रुपये प्रति शेअर असा दुसरा अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सवर गुंजवणूकदारांनी उड्या घेतल्याचं पाहायला मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:41 PM2024-08-20T14:41:37+5:302024-08-20T14:42:04+5:30

Hindustan Zinc share: या कंपनीच्या संचालक मंडळानं १९ रुपये प्रति शेअर असा दुसरा अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सवर गुंजवणूकदारांनी उड्या घेतल्याचं पाहायला मिळालं.

Hindustan Zinc share First rs 10 now rs 19 company is continuously paying dividend on shares share huge hike | Hindustan Zinc share: पहिल्यांदा ₹१०, आता ₹१९; शेअरवर सातत्यानं डिविडेंड देतेय 'ही' कंपनी; रॉकेट बनला भाव

Hindustan Zinc share: पहिल्यांदा ₹१०, आता ₹१९; शेअरवर सातत्यानं डिविडेंड देतेय 'ही' कंपनी; रॉकेट बनला भाव

Hindustan Zinc share: हिंदुस्थान झिंक या वेदांता समूहातील कंपनीच्या संचालक मंडळानं १९ रुपये प्रति शेअर असा दुसरा अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. यापूर्वी कंपनीने प्रति शेअर १० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला होता. या बातमीमुळे मंगळवारी हिंदुस्थान झिंकच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी कंपनीचा शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वधारला आणि ५१३ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. २२ मे २०२४ रोजी शेअरचा भाव ८०७ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तर कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २८५ रुपये आहे. 

३२०० कोटी रुपये उभारले

दरम्यान, हिंदुस्थान झिंकच्या शेअर्स विक्रीच्या ऑफरने सुमारे ३,२०० कोटी रुपये जमा केले आहेत. वेदांता समूहातील कंपनी हिंदुस्थान झिंकच्या समभागांच्या विक्रीच्या ऑफरला किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या विक्रीतून वेदांताला सुमारे ३,२०० कोटी रुपये मिळतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केल्याचं पीटीआयनं म्हटलं.

पैशांचे काय होणार?

वेदांता ओएफएसमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर आपली बॅलन्स शीट दुरूस्त करण्यासाठी आणि विस्तार प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करेल. गेल्या महिन्यात क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या माध्यमातून ८,५०० कोटी रुपयांची भर पडल्याने वेदांता समूह आणि हिंदुस्थान झिंक या दोन्ही कंपन्यांचे कर्ज कमी होण्यास मदत होणार आहे. किरकोळ गुंतवणुकदारांसाठी बेस इश्यू साइज ५१.४४ लाख शेअर्स होते, तर ९३.८२ लाख शेअर्सची खरेदी करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ४.६२ कोटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते, तर एकूण संस्थात्मक खरेदी ६.३६ कोटी शेअर्सची होती. १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान चाललेल्या ओएफएस प्रक्रियेनंतर हिंदुस्थान झिंकमधील वेदांताचा हिस्सा ६३.४२ टक्क्यांवर आला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Hindustan Zinc share First rs 10 now rs 19 company is continuously paying dividend on shares share huge hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.