Join us  

कसं मिळालं Zerodha ला इतकं मोठं यश, नितीन कामथ यांनी केला खुलासा; लोकांचीही होतेय कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 5:16 PM

ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत झिरोदानं अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना मागे टाकलं आहे.

झिरोदा ही देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म आहे. ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत झिरोदानं अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना मागे टाकलं आहे. त्याच्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढतेय. झिरोगा ही तंत्रज्ञानावर आधारित स्टॉक ब्रोकिंग कंपनी असून त्याची सुरुवात २०१० मध्ये झाली. त्याची स्थापना नितीन कामथ आणि निखिल कामथ या दोन्ही भावांनी केली. झिरोदा ही देशातील पहिली डिस्काउंट ब्रोकरेज फर्म आहे. झिरोदाच्या यशामागची कारणं कंपनीचे सीईओ नितीन कामथ यांनी उघड केली आहेत. नितीन कामथ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

झिरोदानं रिटेल ब्रोकिंगचं चित्र बदललं आहे. त्यांच्या यशामागील खरे कारण म्हणजे झिरोधाचे निष्ठावान ग्राहक आहे. सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांच्या मते, झिरोदा त्यांच्या युझर्सकडून मिळालेल्या रेफरल्समुळे वेगानं वाढू शकली आहे. नितीन कामथ यांच्या मतं १० लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांना रेफर केलंय आणि Zerodha ने आपल्या ग्राहकांना सर्वात मोठे रेफरल पेमेंटही केलंय. जे युझर्स त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांना रेफरन्स देतात त्यांना खातं उघडल्यावर ३०० रिवॉर्ड पॉइंट मिळतात. ते स्ट्रीक, सेन्सिबुल, स्मॉलकेस आणि LearnApp सारख्या ब्रोकरच्या पेड सबस्क्रिप्शनसाठी वापरता येतात.

अशी होतेय कमाईझिरोदाच्या विद्यमान रिवॉर्ड प्रोग्रामसह, ग्राहक जानेवारी २०२० पासून त्यांनी रेफर केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या पेमेंट केलेल्या ब्रोकरेजच्या १० टक्के रक्कम देखील मिळवू शकतात. ग्राहकांना रेफरल वॉलेटचं उत्पन्न विथड्रॉव्ह करण्यासाठी किमान ५ लोकांचा संदर्भ देणं आवश्यक आहे. ग्राहकांना रिवॉर्डसाठी पात्र होण्यासाठी रेफरलनं ६० दिवसांच्या आत खातं उघडणं आवश्यक आहे.

टॅग्स :नितीन कामथशेअर बाजार