Lokmat Money >शेअर बाजार > एक सामान्य व्यक्ती शेअर बाजारात किती पैसा गुंतवू शकते? सरकारी नियम जाणणेही आवश्यक

एक सामान्य व्यक्ती शेअर बाजारात किती पैसा गुंतवू शकते? सरकारी नियम जाणणेही आवश्यक

भारतीय शेअर बाजाराचे मुख्यत: दोन स्टॉक एक्सचेन्जच्या माध्यमाने प्रतिनिधित्व केले जाते. यात नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जचा (BSE) समावेश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 06:44 PM2023-05-10T18:44:11+5:302023-05-10T18:45:08+5:30

भारतीय शेअर बाजाराचे मुख्यत: दोन स्टॉक एक्सचेन्जच्या माध्यमाने प्रतिनिधित्व केले जाते. यात नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जचा (BSE) समावेश आहे.

How much money can a common person invest in the stock market know about the government rules | एक सामान्य व्यक्ती शेअर बाजारात किती पैसा गुंतवू शकते? सरकारी नियम जाणणेही आवश्यक

एक सामान्य व्यक्ती शेअर बाजारात किती पैसा गुंतवू शकते? सरकारी नियम जाणणेही आवश्यक


शेअर बाजारातगुंतवणूक करून अनेक लोक छप्परफाड परतावा मिळवतात. तसेच, शेअर बाजारात योग्य पद्धतीने गुंतवणूक केली गेली नाही, तर मोठे नुकसानही होण्याची शक्यता असते. यामुळे, शेअर बाजारात अत्यंत विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागतो. यातच, एखादी व्यक्ती शेअर बाजारात किती रुपयांची गुंतवणूक करू शकते, असा प्रस्नही अनेकांना पडतो. 

आपण शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. याचबरोबर शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स खरेदी करणे हा देखील गुंतवणुकीचाच एक मार्ग आहे. खरे तर, सामान्य माणूस शेअर बाजारात किती रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते? तर हे लक्षात घ्यायला हवे की, कोणतीही व्यक्ती तिच्या बँक बॅलन्सनुसार, कितीही रुपये शेअर बाजारात गुंतवू शकते. महत्वाचे म्हणजे, शेअर बाजारात किती रुपयांपर्यंत गुंतवणूक करायला हवी, यासाठी कुठल्याही प्रकारचा सरकारी नियम नाही. मात्र, शेअर बाजारात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर सेबीची नजर असते. 

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कुठल्याही प्रकारची किमान अथवा कमाल मर्यादा नाही. मात्र, हे आण कोणत्या स्टॉक अथवा ईटीएफमध्ये (एक्सचेन्ज-ट्रेडेड फंड) गुंतवणूक करता यावर अवलंबून आहे. समजा एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपये असू शकतो आणि एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत 1000 रुपये देखील असू शकते. अशात आपण तुमच्या इच्छेनुसार कोणतीही कंपनी निवडू शकता.

भारतीय शेअर बाजाराचे मुख्यत: दोन स्टॉक एक्सचेन्जच्या माध्यमाने प्रतिनिधित्व केले जाते. यात नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जचा (BSE) समावेश आहे.

(टीप - येथे केवळ शेअर बाजारासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: How much money can a common person invest in the stock market know about the government rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.