Join us

पेट्रोल विकणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये 9 दिवसांपासून स्तुनामी, खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली; देतोय बम्पर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 5:54 PM

आज सलग 9व्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत हा शेअर तब्बल 24 टक्क्यांनी वधारला आहे. 

शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात बुधवारी, तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा (HPCL) शेअर 8 टक्क्यांनी वधारला आहे. यानंतर आता हा शेअर 300 रुपयांच्याही पुढे गेला आहे. आज सलग 9व्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत हा शेअर तब्बल 24 टक्क्यांनी वधारला आहे. 

नुवामा इंस्टिट्यूशनल इक्विटीतील तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार HPCL ने दुसऱ्या तिमाहीत ₹8300 कोटी EBITDA नोंदवला. जो अंदाजापेक्षाही 45% अधिक होता. उच्च देशांतर्गत विक्री कमी किरकोळ मार्जिनची भरपाई करते. आम्ही ₹310 च्या टार्गेट प्राइससह आपली रेटिंग होल्ड करून ठेवत आहोत. मोतीलाल ओसवाल यांच्या मते HPCL ने ₹5.9/लीटरच्या अंदाजापेक्षा अधिक मार्केटिंग मार्जिनमुळे ब्रोकरेजचा EBITDA अंदाज पार केला आहे. आम्ही स्टॉकवर ₹315 च्या टार्गेट प्राइससह आपली तटस्थ रेटिंग कायम ठेवत आहोत.

महत्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवासंत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. यामुळेही तेल कंपन्यांच्या शेअर्सना बूस्ट मिळाला आहे. तेलाच्या किंमती मंगळवारी 4% हून अधिकने घसरून जुलैनंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आले आहेत.   

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक