आयटी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असलेल्या एचसीएल टेकने शुक्रवारी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीनं अपेक्षेपेक्षा जास्त नफा कमावलाय. एचसीएल टेकच्या जून २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २० टक्क्यांनी वाढ होऊन तो ४,२५७ कोटी रुपये झालाय. वर्षभरापूर्वी तो ३,५३४ कोटी रुपये होता.
महसुलात ७ टक्क्यांनी वाढ
याव्यतिरिक्त, कंपनीला ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या महसुलात ७ टक्क्यांनी वाढ होऊन तो २८,०५७ कोटी रुपये झालंय. तर निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीतील ३,९८६ कोटी रुपयांच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, तिमाही आधारावर महसुलात १.५ टक्क्यांची घट झालीये. कन्स्टेंट करन्सी प्रकरणी जून २०२४ तिमाहीच्या वर्ष दर वर्ष महसुलात ६ चक्क्यांची वाढ झालीये, तर तिमाही दर तिमाही १.६ टक्क्यांची घसरण झाली. एप्रिल जून २०२४ च्या कालावधीत कंपनीनं ४७९५ कोटी रुपयांचा EBIT नोंदवला, जो वर्ष दर वर्षात ७ टक्क्यांची अधिक आहे.
१२ रुपयांचा डिविडंड मिळणार
कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना डिविडंड देण्याची घोषणा केलीये. बोर्डानं आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी १२ रुपये प्रति शेअरचा अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केलीये. कंपनीनं यासाठी २३ जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केलीये. याची रक्कम १ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे.