Hyundai Motor India IPO : देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ (Hyundai Motor India IPO) मंगळवार, १५ ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आज सब्सक्रिप्शनच्या पहिल्या दिवशी सकाळी ११.०९ वाजेपर्यंत ८% सब्सक्राइब झाला. गुंतवणूकदारांना १७ ऑक्टोबरपर्यंत या इश्यूमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओचा प्राईज बँड १,८६५ ते १,९६० रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आलाय. दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईची भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडनं आयपीओच्या एक दिवस आधी सोमवारी अँकर गुंतवणूकदारांकडून ८,३१५ कोटी रुपये गोळा केले.
हा आयपीओ २७,८७० कोटी रुपयांचा (Hyundai IPO) आहे. यापूर्वी एलआयसीच्या आयपीओची (LIC IPO) साईज २१,००० कोटी रुपये होती. भारतात पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सने नोव्हेंबर २०२१ मध्ये १८,३०० कोटी रुपयांचा आयपीओ आणला. याशिवाय कोल इंडिया लिमिटेडनं ऑक्टोबर २०१० मध्ये १५,१९९ कोटी रुपयांचा आयपीओ लाँच केला होता. रिलायन्स पॉवरनं जानेवारी २००८ मध्ये ११,५६३ कोटी रुपयांचा आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ऑक्टोबर २०१७ मध्ये ११,१७६ कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता.
ग्रे मार्केटमध्ये घसरण
Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये (hyundai motor india ipo gmp) ४० रुपयांच्या प्रीमियमसह उपलब्ध आहेत. म्हणजेच ह्युंदाई मोटरचे शेअर्स २ टक्के प्रीमियमसह २००० रुपयांवर लिस्ट होऊ शकतात. आतापर्यंत ग्रे मार्केटमध्ये हा शेअर ९२ टक्क्यांनी घसरला आहे. विश्लेषक हे नकारात्मक लिस्टिंगचे लक्षण मानत आहेत. २७ सप्टेंबर रोजी हे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ५७० रुपयांच्या किमतीत उपलब्ध होते. तेव्हापासून ग्रे मार्केटमध्ये या शेअरमध्ये दररोज घसरण होत आहे.
कंपनीच्या आयपीओमध्ये ह्युंदाई मोटरकडून (hyundai ipo gmp watch) १४२,१९४,७०० इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे. मूळ कंपनी ह्युंदाई ओएफएस मार्गानं आपला काही हिस्सा विकत आहे. हा आयपीओ पूर्णपणे ओएफएसवर आधारित असल्यानं एचएमआयएलला या आयपीओमधून कोणतीही रक्कम मिळणार नाही.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)