Join us  

जबरदस्त! आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; एकाच दिवसात दिला छप्परफाड परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 10:17 AM

आइस्क्रीम बनवणारी कंपनी Vadilal Industries च्या शेअरमध्ये गेल्या शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली.

आइस्क्रीम बनवणारी कंपनी Vadilal Industries च्या शेअरमध्ये गेल्या शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली. आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी वाडीलाल इंडस्ट्रीजचा शेअर 4 टक्क्यांनी वाढून 2581.30 रुपयांवर बंद झाला. व्यापारादरम्यान शेअरची किंमत 2739.55 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली, जी 10 टक्क्यांपर्यंतची तेजी दर्शवते. यानुसार गुंतवणूकदारांना 255 रुपयांपेक्षाही अधिकचा फायदा झाला आहे.

असं आहे तेजी मागचं कारण - Vadilal Industries च्या बोर्डाने आपल्या प्रमोटर ग्रुप युनिट वाडीलाल इंटरनॅशनलकडून "वाडीलाल" ब्रँडच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. याशिवाय, बोर्डाने प्रमोटर ग्रुपला कंपनीची काही महत्वाची नसलेली संपत्ती आणि व्यवसाय विकायचीही परवानगी दिली आहे.

आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या वाडीलाल इंडस्ट्रीजचे स्वामित्व अहमदाबाद येथील गांधी कुटुंबीयांकडे आहे. या कंपनीत प्रवर्तकांचा एकूण वाटा जवळपास 65 टक्के एवढा आहे. यांपैकी 39 टक्के वाटा हा वाडीलाल इंटरनॅशनल कडे आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक