Join us

छप्परफाड परतावा! ICICI बँकेचा शेअर नव्या उंचीवर, पहिल्यांदाच 900 रुपये पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 4:23 PM

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ICICI बँकेच्या नफ्यात 50 टक्क्यांच्या उसळीसह 6,905 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ICICI बँकेचा शेअर पुन्हा एकदा वधारला आहे. ट्रेडिंग दरम्यान, या शेअरची किंमत 911.75 रुपयांच्या लाइफ टाइम हाईवर पोहोचली आहे. याच बरोबर, या शेअरने सलग दुसऱ्या दिवशी नवी उंची गाठली आहे. मार्केट कॅपिटलचा विचार करता, ते 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

महत्वाचे म्हणजे, एका किंवा अधिक टप्प्यांत इन्फ्रा बॉण्ड्सच्या माध्यमाने 10,000 कोटी रुपये उभारण्यासंदर्भातील योजनांबद्दलच्या वृत्तांवर बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. नुकतेच स्टॉक एक्सचेन्जने मीडिया रिपोर्टच्या माध्यमाने बँकेला स्पष्टीकरण मागितले होते. हे स्पष्टीकरण दिल्यानंतर बँकेच्या स्टॉकने रॉकेट स्पीड घेतला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ICICI बँकेच्या नफ्यात 50 टक्क्यांच्या उसळीसह 6,905 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,616 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला होता. विशेष म्हणजे, बँकेच्या संपत्तीच्या गुणवत्तेतही चांगली सुधारणा झाली आहे. तसेच, नॉन परफॉर्मिंग अॅसेटमध्येही कमी आली आहे. 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :आयसीआयसीआय बँकशेअर बाजारशेअर बाजार