Lokmat Money >शेअर बाजार > Ideaforge IPOची कमाल, २०२२ नंतर १०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला ठरला पहिला इश्यू

Ideaforge IPOची कमाल, २०२२ नंतर १०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला ठरला पहिला इश्यू

Ideaforge IPO : कंपनीच्या IPO ची इश्यू प्राईज ६३८-६७२ रुपये आहे. कंपनीला याद्वारे ५६७ कोटी रुपये जमवायचे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 11:49 AM2023-07-01T11:49:45+5:302023-07-01T11:50:08+5:30

Ideaforge IPO : कंपनीच्या IPO ची इश्यू प्राईज ६३८-६७२ रुपये आहे. कंपनीला याद्वारे ५६७ कोटी रुपये जमवायचे आहेत.

Ideaforge ipo became the first issue to be oversubscribed more than 100 times since IPO peak 2022 investment | Ideaforge IPOची कमाल, २०२२ नंतर १०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला ठरला पहिला इश्यू

Ideaforge IPOची कमाल, २०२२ नंतर १०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला ठरला पहिला इश्यू

Ideaforge IPO : 3 इडियट्स हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटात उडवलेला ड्रोन तुम्हाला आठवत असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की तो ड्रोन आयडियाफोर्जनं बनवला होता. तो चित्रपट जितका सुपरहिट ठरला तितकाच  Ideaforge चा आयपीओही सुपरहिट ठरलाय. ड्रोन बनवणाऱ्या या कंपनीचा इश्यू 26 जूनला उघडला आणि 30 जूनला बंद झाला. दरम्यान, 29 जून रोजी बकरी ईदनिमित्त एक दिवस शेअर बाजाराचं कामकाज बंद राहीलं. Ideaforge चा इश्यू या 4 दिवसात 106 पट सबस्क्राइब झाला.

कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 638-672 रुपये आहे. या इश्यूमधून आयडियाफोर्जला 567 कोटी रुपये उभारायचे आहेत. कंपनीच्या इश्यूसाठी मात्र 33 हजार कोटी रुपयांची बोली लागलीये. Ideaforge चे लॉट साइज 22 शेअर्सचा आहे. कंपनीच्या शेअर्सचं वाटप 5 जुलै रोजी होणार आहे. ज्या लोकांना हे शेअर्स अलॉट होतील त्यांच्या खात्यात हे शेअर्स 7 जुलै रोजी शेअर्स मिळतील.

क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्ससाठी रिझर्व्ह पोर्शनमध्ये 125.81 पट बोली लावण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी रिझर्व्ह हिस्स्यात 85 पट आणि HNI च्या हिस्स्यात 80 पट बोली लावण्यात आलीये. 

567 कोटींचा इश्यू
अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टम आयडियाफोर्जचा इश्यू 567 कोटी रुपयांचा आहे. यापैकी 23 जून रोजी अँकर बुकमधून 254.88 कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित 312 कोटी रुपये सबस्क्रिप्शनसाठी खुले होते. "ड्रोन उद्योगाची मजबूत वाढ पाहता कंपनीचं मूल्यांकन उत्कृष्ट आहे. इश्यूच्या लहान आकारामुळे लिस्टिंग गेन जबरसदस्त असू शकतो," अशी प्रतिक्रिया एसबीआय सिक्युरिटीजनं दिली. 

100 पट सबस्क्राईब
2022 मध्ये, कोणताही IPO 100 पटीपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला नाही. तर 2021 मध्ये 17 कंपन्यांचे सबस्क्रिप्शन 100 पटीपेक्षा जास्त होतं. 2021 मध्ये शेअर बाजारात 1.31 लाख कोटी रुपयांचे एकूण 65 IPO आले.

Web Title: Ideaforge ipo became the first issue to be oversubscribed more than 100 times since IPO peak 2022 investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.