Join us  

ideaForge IPO च्या गुंतवणूकदारांना 'अच्छे दिन', तारखेपूर्वीच होणार लिस्टिंग; पैसा दुप्पट होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 11:26 AM

आधीच्या शेड्युलनुसार, कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 10 जुलै 2023 रोजी होणार होते.

Ideaforge Technology Limited या आघाडीच्या भारतीय ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीनं आपला IPO पूर्वनिश्चित तारखेपूर्वी लिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार ideaForge Technologies चा आयपीओ 7 जुलै 2023 रोजी म्हणजेच शुक्रवारी लिस्ट होईल. आधीच्या शेड्युलनुसार, कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 10 जुलै 2023 रोजी होणार होते.

Ideaforge IPO साठी सबस्क्राईब करण्याची तारीख 26-29 जून रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु शेअर बाजाराच्या सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये बदल केल्यानंतर, कंपनीच्या IPO साठी सबस्क्राईब करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली.

जबरदस्त रिस्पॉन्सचार दिवसांच्या सबस्क्रिप्शन कालावधीत आयडीया फोर्ज टेक्नॉलॉजीचच्या आयपीओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. एकूणच, हा आपलीओ 106.60 पट सबस्क्राईब झाला. अशा प्रकारे 2021 नंतर 100 पेक्षा जास्त पट सबस्क्राईब झालेला हा पहिला आयपीओ ठरला.क्लालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी रिझर्व्ह कॅटेगरी 125.81 टक्के सबस्क्राईब झाली. तर एनआयआय कोट्यातून याला 80.58 टक्के सबस्क्रिप्शन मिळालं. कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कॅटेगरीतून हा आयपीओ 96.65 टक्के सबस्क्राईब झाला.

किती आहे ग्रे मार्केट प्रीमिअम?कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 510-515 रुपये प्रति शेअरच्या प्रीमियमसह उपलब्ध आहेत. याच्या एक दिवस आधी, आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजीजच्या जीएमपीनं 530 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. कंपनीचं व्हॅल्युएशन अधिक असल्यामुळे आयपीओच्या ग्रे मार्केट प्रीमिअममध्ये थोडी घसरण दिसून आलीय. काही विश्लेषकांच्या असा विश्वास आहे की हा IPO लिस्टिंगवर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतो. मात्र, या लिस्टिंगमधून गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात कितपत फायदा होईल, हे सात जुलैलाच कळणार आहे.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसाइनिशिअल पब्लिक ऑफरिंग