Lokmat Money >शेअर बाजार > 'मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले नाही तर, शेअर बाजार २५ टक्क्यांनी घसरू शकतो;' तज्ज्ञांचा मोठा दावा

'मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले नाही तर, शेअर बाजार २५ टक्क्यांनी घसरू शकतो;' तज्ज्ञांचा मोठा दावा

भारतीय शेअर बाजारात येत्या काळात काही चढ उतार दिसून येऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 12:44 PM2023-11-15T12:44:59+5:302023-11-15T12:54:23+5:30

भारतीय शेअर बाजारात येत्या काळात काही चढ उतार दिसून येऊ शकतात.

If narendra Modi government does not return to power the stock market may fall by 25 percent A big claim by experts morgan stanley Jefferies | 'मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले नाही तर, शेअर बाजार २५ टक्क्यांनी घसरू शकतो;' तज्ज्ञांचा मोठा दावा

'मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले नाही तर, शेअर बाजार २५ टक्क्यांनी घसरू शकतो;' तज्ज्ञांचा मोठा दावा

भारतीय शेअर बाजारात येत्या काळात काही चढ उतार दिसून येऊ शकतात. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारावर त्याचा काही परिणाम दिसून शकतो, अशा शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्यात.

शेअर बाजारावर निवडणुकीचा परिणाम
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मॉर्गन स्टॅन्लेच्या तज्ज्ञांनी, पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांचा थेट परिणाम ३.७ ट्रिलियन डॉलर्सचं मूल्य असलेल्या भारतीय शेअर बाजारावर होऊ शकतो आणि यामुळे शेअर बाजारात चढ उतार दिसून येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे . गेल्या काही वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर जवळपास सहा महिन्यांनी देशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पडणाऱ्या मतांच्या परिणामामुळे शेअर बाजारात वाढ झाल्याचे दिसून येईल, तर गुंतवणूकदारांच्या अपेक्षाच्या उलट येणारे कोणतेही परिणाम इक्विटी बेंचमार्कमध्ये ३० टक्क्यांपर्यंत घसरण आणू शकतात.

रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
मॉर्गन स्टॅन्लेचे स्टॅटेजिस्ट रिधम देसाई यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी सोमवारी एक नोट जारी केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांची आघाडी म्हणजेच I.N.D.I.A. त्यांच्यातील एक विश्वसनीय जागा वाटपाची व्यवस्था निवडणुकांमध्ये ध्रुवीकरण करेल आणि मे महिन्यापर्यंत येणाऱ्या परिणामांची भविष्यवाणी कमी करेल. मॉर्गन स्टॅन्लेच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की सरकारच्या संभाव्य बदलानं धोरणात्मक सुधारणा आणि कामकाजाच्या दिशेत बदल होऊ शकतो. ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या सेंटिमेंटवर विपरित परिणाम होऊ शकतो, असं त्यात नमूद केलंय.

जेफरीजची शक्यता
मॉर्गन स्टॅन्लेपूर्वी जेफरीजनं भारतात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या परिणामांमुळे शेअर बाजारावरील परिणामाबद्दल रिपोर्ट जारी केली होती. यामध्ये २०२४ च्या निवडणुकांचे काय परिणाम होतील, सत्ता परिवर्तन होईल की नाही आणि याचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या.

काय म्हटलं जेफरीजनं?
जर निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आलं नाही तर शेअर बाजार २५ टक्क्यांपर्यंत पडू शकतो, असं जेफरीज एलएलसीनं इक्विटी स्ट्रॅटेजीचे ग्लोबल हेड क्रिस वूड यांनी म्हटलं होतं. एका कार्यक्रमात त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी २००४ च्या निवडणुकींचा हवाला दिला. ज्यावेळी भाजपच्या नेतृत्वातील सरकार पडलं होतं तेव्हा दोन दिवसांत बाजार २० टक्क्यांनी घसरला होता, असं त्यांनी म्हटलं.

Web Title: If narendra Modi government does not return to power the stock market may fall by 25 percent A big claim by experts morgan stanley Jefferies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.