Join us

दिवाळी दिवशी 'या' वेळेत पैसे गुंतवल्यास संपत्तीत होईल मोठी वाढ; जाणून घ्या शुभ मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 6:59 PM

उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून देशात कोरोनामुळे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करता आलेली नाही. पण आता यावर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करता येणार आहे.

उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून देशात कोरोनामुळे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करता आलेली नाही. पण आता यावर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करता येणार आहे. आपल्याकडे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पैशाची गुंतवणूकही केली जाते. आता आपण दिवाळीत कोणत्या वेळी पैशााची गुंतवणूक केल्यास फायदा होईल हे जाणून घेणार आहोत. 

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात व्यवहार बंद असतात. पण संध्याकाळी एक तास पैसे गुंतवण्याची संधी असते. दिवाळी निमित्ताने बीएसई आणि एनएसई या प्रमुख शेअर बाजारांमध्ये एक तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र 'मुहूर्त ट्रेडिंग' होणार आहे.

काय सांगता! अर्ध्या किमतीत मिळणार आयफोन, जाणून घ्या काय आहे ऑफर

हे ट्रेडिंग सत्र संध्याकाळी ६:१५ ते ७:१५ दरम्यान होणार आहे, हे व्यवहार मुहूर्तावर करणे शुभ असते असं मानले जाते,  त्यामुळे आर्थिक समृद्धी येते असं बोलले जाते. अनेक गुंतवणूकदार या खास दिवसाची वाट पाहत असतात. या मुहूर्ताच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले तर त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ होते, असे म्हटले जाते.

“काहीही नवीन सुरू करण्यासाठी दिवाळी हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो. यावर्षीच्या दिवाळीत बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रेडिंगमध्ये व्यवहार केल्यास गुंतवणूकदारांना वर्षभर नफा मिळतो असं बोलले जाते.

टॅग्स :शेअर बाजारदिवाळी 2022गुंतवणूक