Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणुकदारांवर डोक्याला हात लावायची वेळ...! दिग्गज ग्रुप कंपनी दिवाळखोर होणार; शेअरचा भाव ₹43 वर आला

गुंतवणुकदारांवर डोक्याला हात लावायची वेळ...! दिग्गज ग्रुप कंपनी दिवाळखोर होणार; शेअरचा भाव ₹43 वर आला

महत्वाचे म्हणजे, IL&FS समूहावर तब्बल ₹94000 कोटींचे कर्ज आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 06:38 PM2024-09-26T18:38:57+5:302024-09-26T18:40:02+5:30

महत्वाचे म्हणजे, IL&FS समूहावर तब्बल ₹94000 कोटींचे कर्ज आहे. 

ilandfs group Company Goes Insolvent share price on 42 rupees | गुंतवणुकदारांवर डोक्याला हात लावायची वेळ...! दिग्गज ग्रुप कंपनी दिवाळखोर होणार; शेअरचा भाव ₹43 वर आला

गुंतवणुकदारांवर डोक्याला हात लावायची वेळ...! दिग्गज ग्रुप कंपनी दिवाळखोर होणार; शेअरचा भाव ₹43 वर आला

नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने (NCLAT) गुरुवारी कर्जात बुडलेल्या IL&FS समूहाच्या IECCL कंपनीच्या दिवाळखोरीसंदर्भातील रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली आहे. याशिवाय, अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती बरुण मित्रा यांच्या खंडपीठाने आयईसीसीएलला समूहाच्या इतर तोट्यात असलेल्या सूचीबद्ध कंपन्यांपासून वेगळे करण्याचे निर्देशही दिले आहेत.

आज गुरुवारी आयएलअँडएफएस इंजिनिअरिंग अँड कंस्ट्रक्शन कंपनीचा शेअर 2% ने वधारून 43.15 रुपयांवर पोहोचला. तसेच वर्षभरात हा शेअर 170% टक्क्यांनी वधारला आहे. मात्र, दीर्घकाळात हा शेअर 94% ने घसरला आहे. 26 ऑक्टोबर 2007 मध्ये या शेअरची किंमत 633 रुपये होती. 

महत्वाचे म्हणजे, एनसीएलएटीने हे देखील स्पष्ट केले आहे की, "IECCL ठरावाच्या प्रस्तावाला विरोध करत असलेल्या कर्जदारांच्या समूहाला त्यांचे संपूर्ण कर्ज संपवण्याचा अथवा चालू रिझोल्यूशन प्रक्रियेत IECCL च्या केवळ 42.25 टक्के हिस्सेदारीचे पैसे देण्यावर आक्षेप घेण्याचे स्वातंत्र्य असेल.’’ 

आयएलअँडएफएस इंजिनिअरिंग अँड कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेडमध्ये 42.25 टक्के हिस्सेदारी असलेला आयएलअँडएफएस समूह आपली हिस्सेदारी विकत आहे आणि त्यांनी स्विस चॅलेंज पद्धतीअंतर्गत निविदा मागवण्यात आल्या आहेत. तसेच, याला एका संभाव्य खरेदीदाराकडून बोली प्राप्त झाली असून कर्जदार 30 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यावर मतदान करू शकतात. महत्वाचे म्हणजे, IL&FS समूहावर तब्बल ₹94000 कोटींचे कर्ज आहे. 

Web Title: ilandfs group Company Goes Insolvent share price on 42 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.