Lokmat Money >शेअर बाजार > मार्क झुकेरबर्गने बिल गेट्स यांना टाकले मागे; अवघ्या काही क्षणांत मालामाल

मार्क झुकेरबर्गने बिल गेट्स यांना टाकले मागे; अवघ्या काही क्षणांत मालामाल

मार्क झुकेरबर्गने बिल गेट्स यांना टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:16 AM2024-02-05T06:16:14+5:302024-02-05T06:17:27+5:30

मार्क झुकेरबर्गने बिल गेट्स यांना टाकले मागे

In just a few moments, the wealth increased by 28.1 billion dollars of mark zuckerberg | मार्क झुकेरबर्गने बिल गेट्स यांना टाकले मागे; अवघ्या काही क्षणांत मालामाल

मार्क झुकेरबर्गने बिल गेट्स यांना टाकले मागे; अवघ्या काही क्षणांत मालामाल

नवी दिल्ली : फेसबुकची मालकी असलेल्या मेटा या कंपनीची तिमाही निकालांत जोरदार नफा झाला आहे. कंपनीचे शेअर्सनी तब्बल २० टक्क्यांची उसळी घेतली आहे. त्यामुळे मेटाचे मालक मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती काही क्षणांत २८.१ अब्ज डॉलर्सनी वाढली. 

ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती १७० अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून त्यांनी सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेटस् यांना मागे टाकून चौथे स्थान गाठले. मेटाचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षाही खूप चांगले निघाले. झुकेरबर्ग यांची संपत्ती २०२२ च्या अखेरीस ३५ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली घसरली होती. वाढती महागाई आणि चढे व्याजदर यांचा फटका मेटाच्या समभागांना बसला होता. (वृत्तसंस्था)

दर तिमाहीला १७.५ कोटी डॉलर्सची कमाई
झुकेरबर्ग यांच्याकडे आजवरच्या सर्वाधिक संपत्तीची नोंद झाली आहे. झुकेरबर्ग यांच्याकडे मेटा या कंपनीचे जवळपास ३५ कोटी शेअर्स आहेत. मिळालेल्या लाभांशावर कर भरल्यानंतरही झुकेरबर्ग यांना दर तिमाहीला १७.५ कोटी डॉलर्स घरी घेऊन जाणार आहेत.

Web Title: In just a few moments, the wealth increased by 28.1 billion dollars of mark zuckerberg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.