Join us

शेअर बाजारातील कमाईवर ‘कर’वाढ

By पुष्कर कुलकर्णी | Published: July 24, 2024 7:36 AM

आर्थिक सर्वेक्षण अहवालात सादर केलेल्या आकडेवारीत भारतात शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांकडून फ्युचर आणि ऑप्शन्स मधील व्यवहार गेल्या पाच वर्षांत चार हजार पटींनी वाढला असल्याचे नमूद आहे.

- डॉ. पुष्कर कुलकर्णी, गुंतवणूक विश्लेषक

केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर बाजाराशी निगडित गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्यासाठी थोडी निराशाच पदरी पडली आहे. बजेट मध्ये फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये व्यवहार करणाऱ्यांना आता अधिक कर सोसावा लागणार आहे. तर गुंतवणूकदारांना अल्प मुदत आणि दीर्घ मुदत भांडवली नफ्यावर अतिरिक्त कर भरावा लागणार आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात सादर केलेल्या आकडेवारीत भारतात शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांकडून फ्युचर आणि ऑप्शन्स मधील व्यवहार गेल्या पाच वर्षांत चार हजार पटींनी वाढला असल्याचे नमूद आहे. प्रत्यक्षांत हा चिंतेचा विषय आहे. विकसनशील देशात असे जुगारी आर्थिक व्यवहार नसावेत अशी भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर ऑप्शन्स प्रीमियमवरील सेक्युरिटी आणि ट्रान्झॅक्शन कर ०.०६२५ वरून ०.१ टक्का इतका तर  फ्युचर विक्री वरील कर ०.०१२५ वरून ०.०२ करण्याचा प्रस्ताव आहे. अशा व्यवहारात ८९ टक्के ट्रेडर्स तोटा सहन करतात. यामुळेच रिटेल ट्रेडर्सने असे व्यवहार कमीत कमी करावेत हा उद्देश यामागे आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून भांडवली नफ्यावरील कर १० टक्क्यांवरून १२.५० टक्के करण्यात येत आहे. तसेच काही मालमत्तेवरील अल्प मुदतीत मिळविलेल्या नफ्यावरील कर वाढवून २० टक्के केला आहे. 

गुंतवणूकदारांनी या बदलाची नोंद घ्यावी. व्यवहारातून फायदा, वाढीव कर तसेच ब्रोकरेज याचा पुन्हा एकदा हिशोब करावा. फ्युचर आणि ऑप्शन्स मधील यश अपयश याचा आढावा घेऊनच पुढील रणनीती आखावी. दीर्घकालीन राहिल्यास फायदाही अधिक असतो. त्या तुलनेत वाढविलेल्या कराचा फार बोजा देणार नाही. याचबरोबर म्युच्युअल फंड्स वरील कर वाढविलेला नसल्याने दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी त्याचाही विचार अवश्य करावा.

एक घाेषणा अन् शेअर बाजार धाडकन खालीमुंबई : ‘एफ ॲण्ड ओ’ व्यवहारांवर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सचे वाढविलेले दर आणि समभागांवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करामध्ये झालेली वाढ यामुळे शेअर बाजारामध्ये निराशेचे वातावरण तयार झाले आणि बाजार काेसळला. सेन्सेक्स एकवेळ सुमारे १२०० अंशांपेक्षा अधिक खाली आला. त्यानंतर बाजारामध्ये काही प्रमाणात खरेदी झाल्याने खाली आलेला निर्देशांक पुन्हा वाढला मात्र दिवसाच्या अखेरीस तो लाल रंगामध्ये बंद झाला. गेल्या अकरा वर्षांमध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार खाली जाण्याची ही पाचवी वेळ आहे. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्प मांडतानाचे भाषण सुरू झाले. त्यानंतर बाजार वर - खाली होत होता. शेअर बाजाराला अपेक्षित असलेल्या सुधारणा फारशा झाल्या नसल्याने बाजार खाली घसरू लागला. 

पाच वर्षांमध्ये सहा वेळा वाढला शेअर बाजारकेंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजाराची प्रतिक्रिया काय असते, याची अनेकांना उत्सुकता लागून असते. मोदी सरकारच्या गेल्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये अर्थसंकल्पानंतर सहावेळा शेअर बाजार वाढीव पातळीवर बंद झाला आहे. केवळ चारवेळा बाजाराची प्रतिक्रिया नकारात्मक आली. सन २०२१च्या अर्थसंलकल्पानंतर बाजाराने घेतलेली ५ टक्क्यांची उसळी सर्वाधिक ठरली, तर सन २०२०मध्ये बाजार जोरदार खाली आला. त्यावेळी बाजाराने २.४३ टक्क्यांचा तोटा गुंतवणूकदारांना दिला.

वर्ष    सेन्सेक्स बंद    वाढ/घट    निफ्टी बंद    वाढ/घट२०२३    ५९,७०८    १५८    १७,६१६    -४६२०२२    ५८,८६२    ८४८    १७,५७७    २३७२०२१    ४८,६००    २३००    १४,२८१    ६४७२०२०    ३९,७३५    -९८८    ११,६६२    -३००२०१९    ३६,४६९    २१२    १०,८९३    ६३

टॅग्स :अर्थसंकल्प 2024शेअर बाजार