BHEL Share: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडनं (BHEL) 1,320-MW मैत्री स्टेट ऑफ द आर्ट थर्मल पॉवर प्रोजेक्ट (STPP) मधील 660 MW युनिट-2 देखील बांगलादेशातील पॉवर ग्रीडशी जोडलं. भेलनं बुधवारी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. थर्मल पॉवर प्लांटला जोडणे म्हणजे निर्धारित पॅरामिटर्सवर वीज पुरवठा सुरू करणं असल्याचं सांगितलं जात आहे.
या वृत्तानंतर, भेलचे शेअर्स इंट्रा-डेमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढले आणि बुधवारी बीएसईवर 101.74 रुपयांचा नवा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. या स्टॉकनं 2018 नंतर प्रथमच 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. महिन्याभरात शेअरच्या किंमतीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या कालावधीदरम्यान बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली.
कंपनीनं काय म्हटलं
हे युनिट दोन्ही देशातील सरकारांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील वचनबद्धतेनुसार सुरू करण्यात आल्याचं कंपनीनं निवेदनाद्वारे सांगितलं. हे लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण करणे खूप अवघड होतं. मैत्री एसटीपीपी बांगलादेशातील बागेरहाट जिल्ह्यातील रामपाल, मोंगला येथे स्थित आहे आणि भेलद्वारे बांगलादेश-भारत मैत्री पॉवर कंपनीसाठी (BIFPCL) याची सुरूवात केली जात आहे. हा बांगलादेश विद्युत विकास मंडळ (BPDB) आणि एनटीपीसी लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)