India GDP Data : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज वाढवला आहे. IMF ने चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 20 बेसिस पॉईंट्सच्या वाढीसह 7 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये IMF ने GDP 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
IMF Growth Forecast: 2024
— IMF (@IMFNews) July 16, 2024
🇺🇸US: 2.6%
🇩🇪Germany: 0.2%
🇫🇷France: 0.9%
🇮🇹Italy: 0.7%
🇪🇸Spain: 2.4%
🇬🇧UK: 0.7%
🇯🇵Japan: 0.7%
🇨🇦Canada: 1.3%
🇨🇳China: 5.0%
🇮🇳India: 7.0%
🇷🇺Russia: 3.2%
🇧🇷Brazil: 2.1%
🇲🇽Mexico: 2.2%
🇸🇦KSA: 1.7%
🇳🇬Nigeria: 3.1%
🇿🇦RSA: 0.9%https://t.co/iO1yVYN8zjpic.twitter.com/GbhWU7Wf0h
...यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 16 जुलै 2024 रोजी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ग्रोथ प्रोजेक्शन जारी केले आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे IMF ने म्हटले आहे. याशिवाय, ग्रामीण भागात खाजगी खप वाढल्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग येऊ शकतो. तर, 2025-26 या आर्थिक वर्षात हा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज असेही IMF ने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, 2023-24 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.2 टक्के होता.
RBI चा अंदाज
जून महिन्यात आरबीआयने आपला अंदाज 7 टक्क्यांवरून 7.0 टक्के केला होता. आरबीआयचा अंदाज आयएमएफच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते 2024-25 मध्ये भारताचा GDP 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या महिन्यातच RBI गव्हर्नर म्हणाले होते की, भारत वार्षिक 8 टक्के विकास दर गाठण्याच्या मार्गावर आहे आणि हे दीर्घकाळ चालू राहू शकते.