Lokmat Money >शेअर बाजार > ₹४००० पार जाऊ शकतो कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, वर्षभरात ७२% चा रिटर्न

₹४००० पार जाऊ शकतो कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, वर्षभरात ७२% चा रिटर्न

कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला आहे. एका वर्षात यात 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:52 PM2024-03-19T13:52:45+5:302024-03-19T13:53:25+5:30

कंपनीच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला आहे. एका वर्षात यात 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

IndiGo Share Price may cross rs 4000 Expert bullish returns of 72 percent in a year know details | ₹४००० पार जाऊ शकतो कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, वर्षभरात ७२% चा रिटर्न

₹४००० पार जाऊ शकतो कंपनीचा शेअर; एक्सपर्ट बुलिश, वर्षभरात ७२% चा रिटर्न

Stock Market News: आज इंटरग्लोब एव्हिएशनच्या (IndiGo Share Price) शेअरच्या किमतीत सुमारे 3 टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 3339 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. कंपनीचा हा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. मंगळवारी म्हणजेच आज बीएसईमध्ये कंपनीचे शेअर्स 2.8 टक्क्यांच्या वाढीसह 3256.45 रुपयांच्या पातळीवर उघडले. दुपारी 12 वाजता कंपनीचे शेअर्स बीएसईवर 3279.65 रुपयांवर व्यवहार करत होते.
 

18 मार्चच्या क्लोजिंग डेटापर्यंत कंपनीचे शेअर्स एका वर्षात 72 टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत बीएसई सेन्सेक्समध्ये केवळ 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर शेअर्सच्या वाढीमागील कारणांबद्दल सांगायचं झालं तर मुख्य कारण म्हणजे पीई रेशोमध्ये वाढ. Trendlyne च्या डेटानुसार, पीई रेश्यो 17.7 आहे.
 

काय म्हणाले एक्सपर्ट्स?
 

ब्रोकरेज कंपन्या कोटक सिक्युरिटीज या स्टॉकबद्दल सकारात्मक आहेत. आगामी काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 4200 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे. ही किंमत सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक आहे. 
 

गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सची किंमत 36.9 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना एका महिन्यात 7.9 टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1810.45 रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप 1,26,253.63 कोटी रुपये आहे. 
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: IndiGo Share Price may cross rs 4000 Expert bullish returns of 72 percent in a year know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.