Lokmat Money >शेअर बाजार > महागाई ठरविणार मार्केटची दिशा, सलग चौथ्या सप्ताहात शेअर बाजाराची भरारी, आणखी तेजी शक्य

महागाई ठरविणार मार्केटची दिशा, सलग चौथ्या सप्ताहात शेअर बाजाराची भरारी, आणखी तेजी शक्य

Stock Market: गुंतवणूकदारांचा विश्वास, बँकांची चांगली कामगिरी, परकीय वित्तसंस्थांची वाढलेली खरेदी आणि उद्योगांची वाढत असलेली कामगिरी या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्स या प्रमुख भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 09:43 AM2022-11-14T09:43:08+5:302022-11-14T09:50:26+5:30

Stock Market: गुंतवणूकदारांचा विश्वास, बँकांची चांगली कामगिरी, परकीय वित्तसंस्थांची वाढलेली खरेदी आणि उद्योगांची वाढत असलेली कामगिरी या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्स या प्रमुख भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे.

Inflation will determine the direction of the market, the stock market will rise for the fourth consecutive week, further growth is possible | महागाई ठरविणार मार्केटची दिशा, सलग चौथ्या सप्ताहात शेअर बाजाराची भरारी, आणखी तेजी शक्य

महागाई ठरविणार मार्केटची दिशा, सलग चौथ्या सप्ताहात शेअर बाजाराची भरारी, आणखी तेजी शक्य

- प्रसाद गो  जोशी
गुंतवणूकदारांचा विश्वास, बँकांची चांगली कामगिरी, परकीय वित्तसंस्थांची वाढलेली खरेदी आणि उद्योगांची वाढत असलेली कामगिरी या जोरावर निफ्टी आणि सेन्सेक्स या प्रमुख भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. आगामी काळात हे निर्देशांक आणखी भरारी घेण्याची शक्यता असली तरी बाजारावर नजिकच्या काळात विक्रीचा दबाव येऊन निर्देशांक काही प्रमाणात खाली येण्याची शक्यता आहे. 
महागाईचे आकडेदेखील बाजारावर परिणाम करू शकतात. बँका आणि वित्तसंस्थांच्या समभागांना मोठी मागणी असलेली दिसून आली. आगामी काळात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. 

परकीय वित्त संस्थांनी केली ६३०० कोटींची खरेदी
n गतसप्ताहात शेअर बाजारात परकीय वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून आल्या. या संस्थांनी ६३०० कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.
n नोव्हेंबर महिन्याचा विचार करता या संस्थांनी आतापर्यंत १८,९७१ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. 
n बाजार खाली असताना तो सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांतर्गत वित्तीय संस्थांनी वाढत्या बाजाराचा फायदा नफा कमवण्यासाठी घेतला. या संस्थांनी सप्ताहात ५६०० कोटी रुपयांचे समभाग विकले असून  त्यातून नफा कमविला आहे.

वाढीची कारणे
यंदा झालेला चांगला पाऊस त्यामुळे खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन ग्रामीण भागातून मागणी वाढण्याची निर्माण झालेली शक्यता
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणारे औद्योगिक उत्पादन. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे वाढलेले मूल्य 
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह काही प्रमाणात व्याजदरात वाढ कमी करण्याचा दिलेला संकेत
गेल्या महिन्यापासून सक्रिय झालेल्या परकीय वित्तीय संस्थांनी भारतात सुरू केलेली खरेदी

Web Title: Inflation will determine the direction of the market, the stock market will rise for the fourth consecutive week, further growth is possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.