Lokmat Money >शेअर बाजार > Infosys Q4 Results : ३०% नफा वाढला, ₹२८ चा डिविडंड; Infosys च्या अनेक मोठ्या घोषणा, एक्सपर्ट बुलिश

Infosys Q4 Results : ३०% नफा वाढला, ₹२८ चा डिविडंड; Infosys च्या अनेक मोठ्या घोषणा, एक्सपर्ट बुलिश

Infosys Q4 Results : आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा 30 टक्क्यांनी वाढून 7969 कोटी रुपये झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:02 AM2024-04-19T11:02:20+5:302024-04-19T11:08:05+5:30

Infosys Q4 Results : आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा 30 टक्क्यांनी वाढून 7969 कोटी रुपये झाला आहे.

Infosys Q4 Results Profit jumps 30 percent Rs 7969 crore company sees FY25 revenue growth 28 rs dividend | Infosys Q4 Results : ३०% नफा वाढला, ₹२८ चा डिविडंड; Infosys च्या अनेक मोठ्या घोषणा, एक्सपर्ट बुलिश

Infosys Q4 Results : ३०% नफा वाढला, ₹२८ चा डिविडंड; Infosys च्या अनेक मोठ्या घोषणा, एक्सपर्ट बुलिश

Infosys Q4 Results : आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा 30 टक्क्यांनी वाढून 7969 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 6128 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा महसूल 1.3 टक्क्यांनी वाढून 37923 कोटी रुपये झालाय, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 37441 कोटी रुपये होता.

संपूर्ण आर्थिक वर्षात नफ्याची स्थिती
 

मार्च 2024 (2023-24) संपलेल्या आर्थिक वर्षात इन्फोसिसचा नफा 8.9 टक्क्यांनी वाढून 26,233 कोटी रुपये झालाय. 2022-23 या आर्थिक वर्षात तो 24,095 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये परिचालन उत्पन्न 4.7 टक्क्यांनी वाढून 1,53,670 कोटी रुपये झाले जे 2022-23 मध्ये 1,46,767 कोटी रुपये होते.
 

इन्फोसिसच्या संचालक मंडळानं 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 8 रुपये विशेष डिविडंडसह 20 रुपये प्रति शेअर फायनल डिविडंडची शिफारस केली आहे. अशा प्रकारे, 28 रुपयांचा डिविडंड देण्यात येणार आहे. याशिवाय कंपनीनं 45 कोटी युरोमध्ये जर्मनीची कंपनी इन-टेकमध्ये 100 टक्के हिस्स्याच्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे. हा व्यवहार पूर्णपणे रोखीनं होणार आहे.
 

शेअरबाबत अंदाज
 

इन्फोसिसच्या तिमाही निकालांपूर्वी कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजनं शेअरवर 1790 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंगचा अंदाज आहे की शेअर 1675 रुपयांवर जाऊ शकतो. शेअरखान आणि नुवामा इंस्टिट्युशनल इक्विटीजनं शेअरला 1850 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहेय.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील ब्रोकरेजची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Infosys Q4 Results Profit jumps 30 percent Rs 7969 crore company sees FY25 revenue growth 28 rs dividend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.