Lokmat Money >शेअर बाजार > Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!

Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!

Innomet Advanced Materials IPO: कंपनीच्या शेअर्सची आज जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीचा शेअर आज १९० रुपयांवर लिस्ट झाला, जो त्याच्या १०० रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या ९० टक्के प्रीमियम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 11:14 AM2024-09-18T11:14:14+5:302024-09-18T11:14:38+5:30

Innomet Advanced Materials IPO: कंपनीच्या शेअर्सची आज जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीचा शेअर आज १९० रुपयांवर लिस्ट झाला, जो त्याच्या १०० रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या ९० टक्के प्रीमियम आहे.

Innomet Advanced Materials IPO Impressive listing 100 percent profit as soon as it hits the market no one is ready to sell | Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!

Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!

Innomet Advanced Materials IPO: इनोमेट अॅडव्हान्स्ड मटेरियल्सचा आयपीओ बुधवारी एनएसईवर लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली. इनोमेट अॅडव्हान्स्ड मटेरियल्सचा शेअर आज १९० रुपयांवर लिस्ट झाला, जो त्याच्या १०० रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या ९० टक्के प्रीमियम आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच या शेअरवर केवळ १० वाजण्याच्या सुमारास खरेदी दिसून आली. दरम्यान, विक्रीचं प्रमाण शून्य असून खरेदीचं प्रमाण १४ लाख ८३ हजार २०० होतं. यामुळेच हा शेअर उघडताच तो ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचला.

११ सप्टेंबरला उघडलेला आयपीओ

इनोमेट अॅडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. कंपनीचा आयपीओ ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होता. तीन दिवसांत हा एसएमई आयपीओ ३०० पेक्षा जास्त पट सब्सक्राइब झाला. बाजारातील सूत्रांनुसार, ३४.२४ कोटी रुपयांच्या या इश्यूमध्ये ३,२५२,००० शेअर्सच्या तुलनेत १,०५,३४,०३,२०० शेअर्ससाठी बोली लागली होती. 

सब्सक्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी इनोमेट अॅडव्हान्स्ड मटेरियल्सचा आयपीओ ७.७७ पट सब्सक्राइब झाला. सब्सक्रिप्शनच्या पहिल्या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबरला तो ०.५३ पट सब्सक्राइब झाले होते. एसएमई आयपीओमध्ये ३४.२४ लाख शेअर्सचा पूर्णपणे नवीन इश्यू होता. आयपीओच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा वापर कंपनी वर्किंग कॅपिटलच्या गरजा आणि भांडवली खर्चासाठी करणार आहे.

कंपनी व्यवसाय काय?

१९८४ मध्ये स्थापन झालेली इनोमेट अॅडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेड ही कंपनी मेटल पावडर आणि टंगस्टन हेवी अलॉयची निर्मिती करते. तांबे, निकेल आणि स्टेनलेस-स्टील पावडरसह २० हून अधिक उत्पादनांसह, इनोमेट जगभरातील उद्योगांना सेवा पुरवते. त्यांची कस्टम मेटल पावडर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि इतर देशांना पुरवली जाते. मार्च २०२४ पर्यंत कंपनीत ५६ कर्मचारी कार्यरत आहेत.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

Web Title: Innomet Advanced Materials IPO Impressive listing 100 percent profit as soon as it hits the market no one is ready to sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.