Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणुकीची मोठी संधी; 'ही' मोठी बँक आणणार बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO...

गुंतवणुकीची मोठी संधी; 'ही' मोठी बँक आणणार बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO...

तुम्ही बजाज हाउसिंग फायनान्स आणि टाटा टेक सारख्या यशस्वी IPO ची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 07:40 PM2024-09-24T19:40:46+5:302024-09-24T19:41:31+5:30

तुम्ही बजाज हाउसिंग फायनान्स आणि टाटा टेक सारख्या यशस्वी IPO ची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे.

investment opportunity; HDFC will bring an IPO like Bajaj Housing Finance | गुंतवणुकीची मोठी संधी; 'ही' मोठी बँक आणणार बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO...

गुंतवणुकीची मोठी संधी; 'ही' मोठी बँक आणणार बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO...

Share Market IPO : तुम्ही बजाज हाउसिंग फायनान्स आणि टाटा टेक सारख्या यशस्वी IPO ची वाट पाहत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपणार आहे. HDFC बँकेने HDB फायनान्शियल सर्व्हिसेसच्या IPO ला मान्यता दिली आहे. या IPO अंतर्गत कंपनी 2500 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर जारी करणार आहे. रिपोर्टनुसार, या इश्यूचे मूल्यांकन $7-8 बिलियनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

कंपनी काय करते?
HDB फायनान्शियल सर्व्हिसेस ही एक आघाडीची NBFC कंपनी आहे, जी प्रामुख्याने रिटेल सेक्टरमध्ये सिक्योर्ड आणि अनसिक्योर्ड कर्ज देते. एचडीएफसी बँकेची एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 94.64 टक्के हिस्सेदारी आहे. सध्या आयपीओसाठी बँकर्सची निवड केली जात आहे. सप्टेंबरच्या मनीकंट्रोलच्या अहवालात मॉर्गन स्टॅनली, बँक ऑफ अमेरिका आणि नोमुरा सारख्या विदेशी संस्था तसेच ICICI सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल आणि IIFL सारख्या देशांतर्गत कंपन्या या प्रक्रियेत सहभागी होत्या.

या कंपनीच्या आयपीओने खळबळ उडवून दिली
अलीकडेच, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO ला दमदार प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ 67 पट सबस्क्राइब झाला. विशेष म्हणजे, हा IPO लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला. त्याचे शेअर्स इश्यू किमतीच्या तुलनेत 135 टक्क्यांनी वाढले. या यशानंतर एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये खूप अपेक्षा आहेत. एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओचा बाजारावर सकारात्मक परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर लवकरच तुम्हाला एक उत्तम संधी मिळेल. 

(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: investment opportunity; HDFC will bring an IPO like Bajaj Housing Finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.