Lokmat Money >शेअर बाजार > Investment Plan: नवीन वर्षात घ्या एक RISK; झपाट्याने वाढेल कमाई, जाणून घ्या...

Investment Plan: नवीन वर्षात घ्या एक RISK; झपाट्याने वाढेल कमाई, जाणून घ्या...

Investment Plan: तुम्हाला नवीन वर्षात कमाई वाढवायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 05:43 PM2022-12-19T17:43:44+5:302022-12-19T17:44:26+5:30

Investment Plan: तुम्हाला नवीन वर्षात कमाई वाढवायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Investment Plan: Take a RISK in the New Year; Earnings will increase rapidly, know details | Investment Plan: नवीन वर्षात घ्या एक RISK; झपाट्याने वाढेल कमाई, जाणून घ्या...

Investment Plan: नवीन वर्षात घ्या एक RISK; झपाट्याने वाढेल कमाई, जाणून घ्या...

Investment Plan: तुम्ही अजून एखाद्या योजनेत गुंतवणूक सुरू केली नसेल, तर भविष्यात तुम्हाला मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सध्या जगभरात महागाईने उच्चांक गाठला आहे, तर सामान्य माणसाची कमाई जैसेथे आहे. पण, तुम्ही रिस्क (Risk) घेण्यासाठी तयार असाल, तर पुढील वर्षी तुमची आर्थिक स्थिती थोडी सुधारू शकते.

आजही अनेकजण बँक (Bank) आणि पोस्ट ऑफिस (Post Office) मधील फिक्स्ड (Fixed Deposit) डिपॉझिटला सर्वात चांगला पर्याय मानतात. पण, यात तुम्हाला जास्तीत-जास्त 7 टक्के व्याज मिळते. तर, महागाईचा दरही याच्या आसपास आहे. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिटमधून तुम्ही जास्त कमाई नाही करू शकत.

500 रुपयांपासून सुरुवात करा
तुमची रिस्क घेण्याची तयारी असेल, तर येत्या वर्षात आपल्या कमाईतील काही रक्कम शेअर मार्केट (Share Market) आणि म्यूचुअल फंड (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक सुरू करा. इथे तुम्ही लहान गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवू शकता. शेअर बाजार आणि म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट (Demat Account) ची गरज असेल, तसेच यात तुम्ही फक्त 500 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करू शकता.

किती कमाई होईल?
उदाहरणार्थ तुमची पगार 30 हजार रुपये आहे आणि यातून तुम्ही 20 टक्के बचत करता. म्हणजेच 6000 रुपयांमधील 4 हजार रुपये म्यूचुअल फंडमध्ये गुंतवा आणि 2000 रुपये थेट शेअर बाजारात लावा. चांगल्या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवत असाल, तर तुम्हाला हमखास मोठा परतावा मिळेल. म्हणजेच, थोडीशी रिस्क घेतली, तर तुम्ही दुप्पट कमाई करू शकता. (नोट: शेअर बाजार आणि म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला आवश्य घ्या.)  

Web Title: Investment Plan: Take a RISK in the New Year; Earnings will increase rapidly, know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.