Join us

Investment Tips: फक्त ६० ₹चा ‘हा’ शेअर १०० ₹वर जाणार? तुम्ही घेतलाय का? बक्कळ परतवा मिळण्याची उत्तम संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 8:04 PM

Investment Tips: ही सरकारी भागिदारी असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून, गेल्या काही वर्षांत कंपनीची कामगिरी उत्तम ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

Investment Tips: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. अन्य देशांतील शेअर बाजारात होणाऱ्या उलाढालींचा भारतातील शेअर मार्केटवरही मोठा परिणाम होताना दिसत आहे. मात्र, यातच काही कंपन्या कमाल कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा देताना दिसत आहे. अशाच एका कंपनीचा फक्त ६० रुपयांवर असलेला शेअर १०० रुपयांवर जाऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. ब्रोकरेज हाऊसने या शेअर्समध्ये गुंतवणुकीतून ७० टक्के परताव्याची शक्यता वर्तवली आहे.

ही कंपनी आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजेच भेल (BHEL). ही सरकारी भागिदारी असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचा शेअर सध्या ६० रुपयांच्या आसपास आहे. कोरोना संकट काळानंतरही गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची कामगिरी चांगली राहिली आहे. तसेच येत्या काळात वीज मागणी वाढल्याचा फायदाही कंपनीला मिळेल, असे सांगितले जात आहे. 

येत्या तिमाहीत कंपनीचे मार्जिन वाढण्याची अपेक्षा

ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजनुसार, सध्याच्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर, येत्या तिमाहीत कंपनीचे मार्जिन वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ होईल. परंतु, यामध्ये ऑर्डरची अंमलबजावणी करण्यात विलंब होणे आणि कच्च्या मालाच्या किमती वाढणे, असे काही जोखमीचे घटकही असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कोरोना संबंधित आव्हाने असूनही, भेल (BHEL) ची कामगिरी चांगली आहे. अंमलबजावणीत सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष २२ मधील ऑर्डर वार्षिक ७६ टक्क्यांनी वाढून २३,६०० कोटींवर पोहोचल्या. आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत एकूण ऑर्डर बुक १ लाख कोटींवर पोहोचले आहे.

दरम्यान, कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती पाहता, ब्रोकरेजने शेअरमध्ये गुंतवणूकीसाठी १०० रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्याच्या ५९ रुपयांच्या किंमतीपासून ते ७० टक्के मजबूत असू शकते. पहिल्या शेअरचे लक्ष्य ७६ रुपये होते.

 

टॅग्स :शेअर बाजार